शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधवांच्या शिक्षेचे परिणाम भोगण्यासाठी तयार- पाक मीडिया

By admin | Updated: April 11, 2017 14:35 IST

भारतीय नौसेनेतील माजी अधिकारी कुलभूषण जाधवांना न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानी मीडियाला आनंदाचं भरतं आलं

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 11 - भारतीय नौसेनेतील माजी अधिकारी कुलभूषण जाधवांना न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानी मीडियाला आनंदाचं भरतं आलं आहे. जाधवांना न्यायालयानं फाशीच्या शिक्षेचा दिलेला निर्णय हा अभूतपूर्व असल्याचा पाक मीडियानं म्हटलं आहे. तर तज्ज्ञांच्या मते, या कृतीमुळे पाकिस्तानचं राजकीयदृष्ट्या वजन वाढलं आहे. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं हेरगिरी केल्याचा ठपका ठेवत जाधवांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर पाकिस्तानी मीडियानंही या शिक्षेचं जोरदार समर्थन करणं सुरूच ठेवलं आहे. पाकिस्तानमधील इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र असलेल्या द नेशननं पहिल्या पानावर "हेरगिरी करण्यासाठी मृत्यू" ही शिक्षा असल्याचं छापलं आहे. राजकीय आणि संरक्षण विश्लेषक डॉ. हसन अन्सारी यांच्यामते, या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील तणावामध्ये वाढ होणार असून, पाकिस्ताननं या गुन्ह्यासाठी गंभीर शिक्षा दिल्याचंही द नेशननं छापलं आहे. हेरगिरी आणि विघातक कृत्ये केल्याचा आरोप ठेवून वर्षभरापूर्वी बलुचिस्तानमध्ये अटक केलेल्या कुलभूषण सुधीर जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी कोर्टानं काल फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत असून ठिकठिकाणी शिक्षेविरोधात निदर्शनं सुरू आहेत.कोण आहेत कुलभूषण ?कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी होते. ते भारताच्या रिसर्च अ‍ँड अ‍ॅनलिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी 3 मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना 12 मे 2014 रोजी पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे.