ऑनलाइन लोकमत
बैरूत, दि. २३ - रमजानच्या पवित्र महिन्यात दिवसा जेवून रोझा मोडल्याचा आरोप ठेवत इसिसने दोन मुलांना फासावर लटकवल्याचे सीरियामधील मानवाधिकार संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.
या संघटनेच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीरियामधील मायादिन गावातील १८ वर्षाखालील दोन मुलांवर रोझे मोडल्याचा आरोप ठेवण्यात आला. ही दोन मुले दिवसा जेवत असताना त्यांना पकडण्यात आले होते. त्यानंतर त्यांना फाशी देण्यात आली. 'या दोघांनीही कोणत्याही कारणाशिवाय रोजे तोडले आहेत' असे त्यांच्या मृतदेहाजवळील चिठ्ठीत लिहीले असल्याचेही समजते.
मुस्लिम नागरिकांमध्ये अतिशय पवित्र मानल्या जाणा-या रमजान महिन्यास नुकतीच सुरूवात झाली असून या महिन्यात नागरिक सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत काहीही खात नाहीत.