न्यूयॉर्क : गोल्डमॅन साक्सचे माजी संचालक आणि प्रदीर्घ काळ अमेरिकेतील भारतीयांच्या यशाचे प्रतीक ठरलेले रजत गुप्ता हे इनसायडर ट्रेडिंगच्या गुन्ह्यात दोन वर्षांची कैद भोगण्यासाठी कारागृहात दाखल झाले आहेत. गुप्ता यांनी त्यांना ठोठावण्यात आलेला १.४ कोटी डॉलरचा दंड व कोणत्याही सार्वजनिक कंपनीमध्ये काम करण्यास घातलेल्या बंदीविरुद्ध अपील केले होते. त्यांची ही दोन्ही अपिले फेटाळून लावण्यात आली आहेत. गुप्ता यांना आता अमेरिकी रोखे व विनिमय आयोगातर्फे दाखल इनसायडर ट्रेडिंगच्या समांतर प्रकरणात दंड म्हणून १.३९ तोटी डॉलरचा दंड भरावा लागेल. याशिवाय त्यांना एका गुन्हेगारी प्रकरणात ५० लाख डॉलर व गोल्डमॅन साक्सला ६२ लाख डॉलरची नुकसानभरपाई द्यावी लागेल. (वृत्तसंस्था)
रजत गुप्तांचा कारावास सुरू
By admin | Updated: June 19, 2014 04:16 IST