शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

आक्रोश अन् संताप!

By admin | Updated: December 17, 2014 02:44 IST

पेशावर येथील निर्घृण हल्ल्याचा जगभरातल्या नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या घृणास्पद कृत्याचा संताप अनेक नेत्यांनी ट्विटर, तसेच अन्य माध्यमांतून व्यक्त केला

पेशावर येथील निर्घृण हल्ल्याचा जगभरातल्या नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या घृणास्पद कृत्याचा संताप अनेक नेत्यांनी ट्विटर, तसेच अन्य माध्यमांतून व्यक्त केला. धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या दृष्टीने या घटनेकडे पाहायला हवे आणि जगातील दहशतवाद नष्ट करायला हवा असा सूर या नेत्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेतून व्यक्त केला. पाकिस्तानमध्येही याविरोधात संताप व्यक्त होत होता. 12:05 : पेशावर येथील आर्मी शाळेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात पाच विद्यार्थ्यांसह सात जण जखमी झाले. सहा दहशतवादी शाळेत घुसल्याची पोलिसांची माहिती.12:11 : तहरिक ए तालिबान संघटनेने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी.12:13 : शाळेत गोळीबार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा. ५००हून अधिक विद्यार्थी व शिक्षक ओलीस. 12:20 : गोळीबारीत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि दहा जण जखमी झाल्याचे वृत्त धडकले.12:25 : पाच ते सहा दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याच्या वृत्ताला पाकिस्तानी सैन्याकडून दुजोरा. बचावकार्याला ताबडतोब सुरुवात.12:28 : तालिबानचा प्रवक्ता मुहम्मद उमर खोरासानी बरळला. म्हणे, ‘‘विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता जवानांवर हल्ला करण्याची सूचना दिली आहे.’’12:30 : आणखी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू व २७हून अधिक जण जखमी. 12:35 : दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचे प्रत्यक्षदर्शींची माहिती. गोळीबार सुरू होताच शाळेबाहेर पळापळ सुरू.12:40 : दहशतवादी आणि सैनिकांच्या चकमकीत सैनिकाचा मृत्यू. जखमींचा आकडा ३५वर.01:00 : अनेक विद्यार्थी व शिक्षकांची सुखरूप सुटका करण्यात आली.01:07 : उत्तर वझिरीस्तान येथे सैनिकांनी केलेल्या हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी हा हल्ला केल्याचा तालिबानी संघटनेचा  दावा.01:10 : मृतांचा आकडा १८वर. मृतांमध्ये १५ विद्यार्थ्यांचा समावेश.01:20 : १७ विद्यार्थ्यांसह २१हून अधिक मृत्युमुखी. ४५ जण जखमी.01:43 : सुटका झालेल्या विद्यार्थ्यांनी दहशतवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्र असल्याचे सांगितले.01:45 : शाळेतील मुख्य भाग आणि ज्युनिअर विभाग रिकामी करण्यात आला. सैन्याने पुढील कारवाईसाठी मोर्चा प्रशासकीय             विभागाकडे वळवला.02:10 : मृतांचा आकडा १०४वर पोहोचला. त्यात ८४ विद्यार्थ्यांचा समावेश02:11 : पंतप्रधान नवाज शरीफ पेशावरच्या दिशेने रवाना.03:18 : शाळेत दोन स्फोट.03:35 : पाकिस्तानातील रेडिओ वृत्तानुसार मृतांची संख्या १२६वर पोहोचली.03:47 : शाळेत आणखी एक स्फोट.04:10 : पाचव्या दहशतवाद्याला ठार मारण्यात सैनिकांना यश.05:20 : सहावा दहशतवादी ठार.