शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

सर्वाधिक काळ ब्रिटिश राजसत्तेत राहणारी राणी

By admin | Updated: September 9, 2015 03:11 IST

अर्ध्याहून अधिक जगावर ज्या राजसत्तेचे राज्य होते आणि ज्या राजाच्या साम्राज्यावरील सूर्य कधीच मावळत नसे अशा सत्तेमध्ये ६३ वर्षे महाराणी पदावर राहण्याचा विक्रम राणी

लंडन : अर्ध्याहून अधिक जगावर ज्या राजसत्तेचे राज्य होते आणि ज्या राजाच्या साम्राज्यावरील सूर्य कधीच मावळत नसे अशा सत्तेमध्ये ६३ वर्षे महाराणी पदावर राहण्याचा विक्रम राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी केला आहे. वयाच्या २५व्या वर्षी राजगादीवर आलेल्या एलिझाबेथ या आता ८९ वर्षांच्या असून, ब्रिटिश राजवंशातील सर्वाधिक काळ जगलेल्या व्यक्ती असेही रेकॉर्ड त्यांनी बनविले आहे.आज (९ सप्टेंबर) त्यांना ब्रिटिश राजसत्तेचे प्रमुखपद हातात घेऊन ६३ वर्षे पूर्ण होत आहेत. या सहा दशकांच्या कालावधीत त्यांनी ब्रिटिश संसदेत अनेक पंतप्रधानांचा कार्यकाळ, अनेक आशियाई, आफ्रिकन देशांचे स्वातंत्र्यही पाहिले.तुम्हाला हे माहीत आहे का?राणी एलिझाबेथ द्वितीय यांना लहानपणी लिलिबेट अशा नावाने हाक मारली जाई. राणीपदावर असताना त्यांनी विविध देशांना भेटी दिल्या आहेत. आजवर ११६ देशांना २६५ भेटी देण्याचा त्यांचा विक्रम आहे. अमेरिकेच्या गेल्या १३ राष्ट्राध्यक्षांपैकी त्यांनी १२ राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली आहे. व्हाइट हाउसलादेखील त्यांनी भेट दिली आहे. विन्स्टन चर्चिल, अँथनी एडन, हेरॉल्ड मॅकमिलन, अ‍ॅलेक डग्लस होम, हेरॉल्ड विल्सन, एडवर्ड हिथ, मार्गारेट थॅचर, जॉन मेजर, टोनी ब्लेअर, गॉर्डन ब्राऊन यांच्यासह आताचे ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या कार्यकाळाच्या त्या साक्षीदार आहेत.२१ एप्रिल १९२६राणी एलिझाबेथ व राजा जॉर्ज सहावा यांच्या पोटी जन्म२० नोव्हेंबर १९४७फिलिप माऊंटबॅटन आॅफ ग्रीस अँड डेन्मार्क यांच्याशी विवाह१४ नोव्हेंबर १९४८प्रिन्स चार्ल्सचा जन्म१५ आॅगस्ट १९५०प्रिन्सेस अ‍ॅनीचा जन्म२ जून १९५३राज्याभिषेक१९ फेब्रुवारी १९६०प्रिन्स अँड्य्रूचा जन्म१० मार्च १९६४प्रिन्स एडवर्डचा जन्म३१ आॅगस्ट १९९७युवराज्ञी डायनाचा मृत्यू