शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

कतार निर्बंधांस विमान संघटनेचा विरोध

By admin | Updated: June 7, 2017 00:10 IST

कतारवर लादलेल्या हवाई वाहतूक निर्बंधांना जागतिक विमान वाहतूक कंपन्यांच्या संघटनेने विरोध केला आहे

कॅनकन : पश्चिम आशियातील काही देशांनी कतारवर लादलेल्या हवाई वाहतूक निर्बंधांना जागतिक विमान वाहतूक कंपन्यांच्या संघटनेने विरोध केला आहे. आम्ही निर्बंधांच्या विरोधात असून कतारसोबतचे हवाई संबंध शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यात यावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. या निर्बंधामुळे भारतातील दिल्ली वगळता अन्य शहरातून दोहा येथील विमानप्रवास महाग आणि अधिक अंतराचा होणार आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक महासंघाचे (आएटा) सीईओ आणि महासंचालक अ‍ॅलेक्झांडर डे जुनियाक यांनी ही माहिती दिली. सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब आमिरात आणि बहारिन या देशांनी कतारसोबतचे राजनैतिक संबंध तोडले आहेत. त्यासोबतच कतारसोबतची हवाई वाहतूकही बंद करण्यात आली आहे. कतार एअरलाइन्स, एअर इंडिया आणि दोन भारतीय खासगी कंपन्यांची कतार येथे विमानसेवा आहे. निर्बंधांमुळे या कंपन्यांना सौदी अरेबिया व अन्य देशांची हवाई हद्द वापरता येणार नाही. त्यांना लांबचा प्रवास करावा लागेल. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढेल आणि भाडेही वाढेल, असे दिसते.कतारमध्ये साडेसहा लाख भारतीय आहेत. ते तिथे रोजगारासाठी गेले असून, ते नियमितपणे भारतात येत असतात. त्यांनाही या निर्बंधांचा फटका बसेल. तसेच युरोपमध्ये कतारमार्गे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच घटेल. अन्य मार्गाने युरोपला जाण्यासाठी ते अर्थातच कतार एअरलाइन्स वगळता अन्य कंपन्यांची तिकिटे काढतील आणि त्याचा आर्थिक फटका कतार एअरलाइन्सला बसेल.जुनाईक यांनी सांगितले की, भारतासह आशिया प्रशांत क्षेत्रातील हवाई वाहतूक गेल्या काही आठवड्यांत स्थिर होती. त्यातच २१ मार्च रोजी अमेरिकेने पश्चित आशिया आणि उत्त्तर अमेरिकेतील देशांना जाणाऱ्या विमानांत वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास बंदी घातली होती.>भारतीयांना फटकापश्चिम आशियाई देशांनी कतारवर घातलेल्या हवाई बंदीमुळे विमान प्रवास महागणार आहे. भारतीयांना त्याचा मोठा फटका बसेल. सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब आमिरात आणि बहारिन या देशांची अमेरिका अथवा युरोपला जाणारी विमाने आतापर्यंत दोहा मार्गेच जात होती. तसेच काही विमाने कतारवरून उड्डाण करत होती. दिल्लीहून जाणारी विमाने प्रामुख्याने हा मार्ग स्वीकारीत असत. हा जवळचा मार्ग आहे. आता त्यांना इराणमार्गे जावे लागेल. त्यामुळे आता तिकिटांचा खर्च वाढणार आहे. आधीच परदेशात गेलेल्या भारतीयांना त्याचा फटका बसेल.