शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुतिन-मोदींची चर्चा, भारत-रशियामध्ये १६ महत्त्वाचे करार

By admin | Updated: October 15, 2016 16:21 IST

भारत आणि रशियामध्ये संरक्षण, पायाभूत सुविधा, विज्ञान, रिसर्च, अंतराळ संशोधन आणि अन्य महत्त्वाच्या मुद्यांवर विविध क्षेत्रांशी संबंधित महत्त्वपूर्ण करार झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत 

पणजी, दि. 15 - भारत आणि रशियामध्ये संरक्षण, पायाभूत सुविधा, विज्ञान, रिसर्च, अंतराळ संशोधन आणि अन्य महत्त्वाच्या मुद्यांवर विविध क्षेत्रांशी संबंधित महत्त्वपूर्ण करार झाले आहेत. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर दोन्ही देशांतील 16 महत्त्वपूर्ण करारांची घोषणा करण्यात आली. दोन्ही देशांनी दहशतवादाविरोधातील एकमेकांच्या भूमिकांचे समर्थन केले आणि विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर देण्याचे ठरवले आहे.
 
हवाई संरक्षणाला अधिक बळकटी देण्याच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून S-400 ट्रीम्फ (Triumf) हे मिसाइल सिस्टम घेण्याचे ठरवले आहे.  याशिवाय भारतात कामोव हेलिकॉप्टर्सची निर्मित करण्याबाबतही संमती दर्शवण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रात भागीदारी मजबूत करण्यासाठी दोन्ही देश लष्करी उद्योगसंदर्भातील वार्षिक परिषदही घेतील, असे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. S-400 ट्रीम्फ मिसाइल सिस्टमची 400 किलोमीटरपर्यंतच्या हवाई कक्षेत मारा करण्याची क्षमता आहे.  या कराराची किंमत पाच मिलियन डॉलर एवढी आहे. शस्त्रूचे मिसाइस आपल्या विमान अथवा कुठल्या संस्थानवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे मिसाइल सिस्टम फार कमी वेळात त्याला नेस्तनाबूत करेल, असे मिसाइलचे वैशिष्ट्य आहे

 
दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेषतः दहशतवादाचा मुद्दाही उपस्थित केला. 'भारत आणि रशियाची दहशतवादाविरोधातील विचार एकसारखे आहेत. सीमेवरील दहशतवादी हल्ल्यांविरोधात कारवाई करण्याच्या भारताच्या भूमिकेला समर्थन दिल्याबद्दल आम्ही रशियाचे आभार मानतो'. असेही मोदींनी म्हटले आहे. दहशतवादाविरोधातील कठोर भूमिका आणि अफगाणिस्तानातील सद्यपरिस्थिती यावरही दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. यावेळी उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा रशियाने निषेधही व्यक्त केला.