शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आयोवात डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का

By admin | Updated: February 3, 2016 02:48 IST

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आयोवातील निकाल आज जाहीर झाले. टेक्सासचे सिनेटर टेड क्रूज यांनी रिपब्लिकनचे वादग्रस्त दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांना टक्कर देत

वॉशिंग्टन : अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आयोवातील निकाल आज जाहीर झाले. टेक्सासचे सिनेटर टेड क्रूज यांनी रिपब्लिकनचे वादग्रस्त दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांना टक्कर देत त्यांच्यावर आघाडी घेतली, तर हिलरी क्लिंटन आणि बर्नी सँडर्स यांच्यात काट्याची लढत झाली. त्यात हिलरी यांनी सँडर्स यांच्यावर निसटती मात केली.आयोवातील निकालावरून असे दिसत आहे की, अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रमुख तीन दावेदारांत ही लढत होणार आहे. आयोवात क्रूज आणि ट्रम्प यांच्यानंतर मार्को रुबिया जोरदार टक्कर देताना तिसऱ्या स्थानावर आहेत. ४५ वर्षीय क्रूज यांना एकूण मतांच्या २८ टक्के, तर ट्रम्प यांना २४ टक्के मते मिळाली आहेत. क्रूज यांना ट्रम्प यांच्यापेक्षा ५५०० मते अधिक मिळाली आहेत. रुबियो यांना २३ टक्के मते मिळाली आहेत. न्यूरोसर्जन ते राजकीय नेते असा प्रवास करणारे बेन कार्ल्सन हे चौथ्या स्थानावर आहेत. पण, त्यांना फक्त ९ टक्के मते मिळाली आहेत. डेमोक्रेटिक कॉकसमध्ये हिलरी क्लिंटन आणि बर्नी सँडर्स यांच्यात काट्याची लढत दिसत आहे. अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनण्यासाठी जोरदार तयारी करत असलेल्या ६८ वर्षीय हिलरी क्लिंटन यांना ५० टक्के मते मिळाली आहेत, तर सँडर्स यांना ४९ टक्के मते मिळाली आहेत. प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी म्हटले आहे की, दुसऱ्या स्थानावर राहिल्यामुळे मी सन्मानित झाल्याचा अनुभव घेत आहे. क्रूज यांना मी शुभेच्छा देतो. १६ जून २०१५ रोजी मी जेव्हा प्रचार सुरू केला तेव्हा मी अयोवात दुसऱ्या स्थानावर राहण्याची अपेक्षा बाळगली नव्हती.न्यू हॅम्पशायर आणि दक्षिण कॅरोलिनात होणाऱ्या प्राइमरी निवडणुकांचा उल्लेख करून ते म्हणाले की, येथे आम्हाला चांंगला प्रतिसाद मिळेल. डेमोक्रेटिकचे संभाव्य उमेदवार हिलरी क्लिंटन अथवा सँडर्स यांना आपण पराभूूत करू, असेही ते म्हणाले. आयोवानंतर आता व्हाईट हाऊसची लढत न्यू हॅम्पशायरमध्ये पोहोचली आहे. येथे ९ फेब्रुवारीला प्राइमरी निवडणुका होणार आहेत. त्यानंतर दक्षिण कॅरोलिनात निवडणुका होतील.