शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांबाबतच्या ट्रम्प यांच्या धोरणाचा निषेध

By admin | Updated: May 17, 2016 04:49 IST

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुस्लिमांबाबतच्या धोरणांवर अध्यक्ष बराक ओबामा यांनी टीका केली

वॉशिंग्टन : अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुस्लिमांबाबतच्या धोरणांवर अध्यक्ष बराक ओबामा यांनी टीका केली आहे. अमेरिका आणि अन्य देशात भिंती उभारण्याच्या योजनेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे कट्टरपंथीयांविरुद्धच्या लढाईत अमेरिकेचे प्रमुख सहकारी दुरावले जातील, अशी भीतीही ओबामा यांनी व्यक्त केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचे वक्तव्य यापूर्वीच केलेले आहे. रुटगर्स विद्यापीठात दीक्षान्त समारंभात ओबामा यांनी ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. अमेरिका आणि मेक्सिको सीमेवर भिंत बनविण्याच्या ट्रम्प यांच्या प्रस्तावावर ओबामा म्हणाले की, जग पूर्वीपेक्षा जास्त जवळ येत आहे. आंतरराष्ट्रीय संबंध वाढत आहेत. भिंती उभ्या करून ही परिस्थिती बदलता येणार नाही. जेव्हा एखाद्या देशाची एकूणच परिस्थिती बिघडते, तेव्हा तो देश अतिरेक्यांसाठी आश्रय बनतो. जेव्हा विकसनशील देशांकडे पुरेशा आरोग्य सुविधा नसतात, तेव्हा झिका आणि इबोला यासारखे रोग पसरत जातात. हे रोग अमेरिकेलासुद्धा संकटात टाकू शकतात. कोणतीही भिंत याला रोखू शकत नाही. मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यात येईल या विचारांनाच ओबामा यांनी आव्हान दिले. ते म्हणाले की, मुस्लिमांबाबतची ही विचारधारा म्हणजे आमच्या मूूल्यांशी हा विश्वासघात ठरेल. आमच्या अस्तित्वाशी विश्वासघात ठरेल.