शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेकडून १ हजार विमाने, तेल व गॅस खरेदीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 04:43 IST

भारत आणि अमेरिकेत निर्माण झालेला कर संघर्ष शमविण्यासाठी भारताने प्रयत्न सुरू केले असून

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेत निर्माण झालेला कर संघर्ष शमविण्यासाठी भारताने प्रयत्न सुरू केले असून, आगामी ७ ते ८ वर्षांत अमेरिकेकडून १ हजार नागरी विमाने खरेदी करण्याचा, तसेच तेल व गॅसची खरेदी वाढविण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे. वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्या आठवड्यात हा प्रस्ताव अमेरिकी वाणिज्य मंत्र्यांसमोर ठेवला.अमेरिकेने भारताच्या पोलाद व अ‍ॅल्युमिनियमवर कर लादल्यानंतर भारतानेही अमेरिकेच्या २९ वस्तूंवर कर लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही देशांत निर्माण झालेला व्यापारी संघर्ष शांत करण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, असे सूत्रांनी सांगितले.भारताने दिलेल्या अधिकृत प्रस्तावावर अमेरिकी व्यापार प्रतिनिधी मार्क लिन्स्कॉट हे रविवारी नवी दिल्लीत भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. ६ जुलै रोजी वॉशिंग्टनमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन अमेरिकी परराष्ट्रमंत्री माईक पोम्पेव आणि संरक्षणमंत्री जेम्स मॅटीस यांच्याशी चर्चा करणार आहेत. वॉशिंग्टनमधील या चर्चेपूर्वीच या मुद्यावर काही तरी तोडगा काढण्याचा भारताचा प्रयत्न आहे, असे सूत्रांनी सांगितले.भारताने अमेरिकेपुढे मांडलेल्या हिशेबानुसार, भारताकडून अमेरिकेला दरवर्षी विमान खरेदीपोटी ५ अब्ज डॉलर आणि तेल व गॅसच्या खरेदीपोटी ४ अब्ज डॉलर मिळत राहातील. ही रक्कम संरक्षण खरेदीच्या व्यतिरिक्त आहे.