शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘गांधी’ चित्रपटाचे निर्माते रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचे निधन

By admin | Updated: August 25, 2014 23:48 IST

महात्मा गांधी यांचे जीवन पडद्यावर आणण्यासाठी तब्बल २० वर्षे परिश्रम घेणारे आॅस्कर विजेते ब्रिटिश चित्रपट निर्माते रिचर्ड अ‍ॅटनबरो (९०) यांचे निधन झाले.

लंडन : महात्मा गांधी यांचे जीवन पडद्यावर आणण्यासाठी तब्बल २० वर्षे परिश्रम घेणारे आॅस्कर विजेते ब्रिटिश चित्रपट निर्माते रिचर्ड अ‍ॅटनबरो (९०) यांचे निधन झाले. त्यांचा बापूजींच्या जीवनावरील ‘गांधी’ हा चित्रपट १९८२ मध्ये प्रदर्शित झाला होता. अलीकडे अ‍ॅटेनबरो यांची प्रकृती बरी नव्हती. रविवारी दुपारच्या जेवणावेळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला, असे त्यांचे चिरंजीव मायकल अ‍ॅटनबरो यांनी सांगितले. चार दिवसांनी ते ९१ वा वाढदिवस साजरा करणार होते. ‘गांधी’ चित्रपटासाठी अ‍ॅटनबरो यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा अकादमी पुरस्कार (आॅस्कर अवॉर्ड) मिळाला होता. त्यावर्षीच्या आॅस्कर सोहळ्यात ‘गांधी’ने धूम केली होती. या चित्रपटाने आठ आॅस्कर पटकावले होते. त्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक व सर्वोत्कृष्ट अभिनेता आदी पुरस्कारांचा समावेश होता. ‘गांधी’ चित्रपटामुळे अ‍ॅटनबरो यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात बेन किंग्सले यांनी महात्मा गांधी यांची भूमिका केली होती. या चित्रपटाला समीक्षकांनी गौरविले, तसेच प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतले होते. अ‍ॅटनबरो यांना श्रद्धांजली अर्पण करताना ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून म्हणाले की, ‘ब्राइटन रॉक’ चित्रपटात त्यांनी दमदार अभिनय केला होता. ‘गांधी’ चित्रपटाचे त्यांनी केलेले दिग्दर्शन सर्वांगसुंदर होते. अ‍ॅटेनबरो हे चित्रपट क्षेत्रातील महनीय व्यक्तींपैकी एक होते. अ‍ॅटनबरो यांना डिकी या टोपणनावानेही ओळखले जाई. अ‍ॅटनबरो यांच्या स्मृती जागविताना किंग्सले म्हणाले, गांधीजींची भूमिका मी चांगल्या प्रकारे वठवील, असा विश्वास त्यांना होता. गांधी चित्रपटाचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना २० वर्षे लागली. त्यांनी मला गांधीजींची भूमिका देऊ केली तेव्हा मला खूप आनंद झाला, असेही ते म्हणाले. कुटुंबासह मित्र, देश आणि करिअरशी त्यांचा खूप जिव्हाळा होता. त्यांनी ‘गांधी’ चित्रपटाद्वारे जगाला अनमोल भेट दिली आहे, असे स्पीलबर्ग म्हणाले. वयाच्या १२ व्या वर्षीच त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. १८ वर्षांचे असताना त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक रंगभूमीवर आले होते. १९४२ मध्ये त्यांचा पहिला चित्रपट ‘इन व्हीच वुई सर्व’ पडद्यावर झळकला होता. (वृत्तसंस्था)