शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या उपस्थितीत जितची १६ वर्षांनी पालकांशी पुनर्भेट

By admin | Updated: August 4, 2014 02:05 IST

एखाद्या बॉलीवूड चित्रपटातील भावुक दृश्य असावे असे वाटत होते; मात्र तो चित्रपटातील नाही तर खराखुरा प्रसंग होता.

काठमांडू : एखाद्या बॉलीवूड चित्रपटातील भावुक दृश्य असावे असे वाटत होते; मात्र तो चित्रपटातील नाही तर खराखुरा प्रसंग होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ वर्षांपूर्वी कुटुंबाशी ताटातूट झालेल्या एका नेपाळी तरुणाची रविवारी त्याच्या कुटुंबियांशी पुनर्भेट घडवून आणली. आता २६ वर्षांचा असलेला जित बहादूर १६ वर्षांपूर्वी भारतात हरवला होता. मोदींना तो अहमदाबादेत सापडला. तेव्हापासून मोदी त्याच्या पालकत्वाची भूमिका पार पाडत आहेत. जितचे कुटुंबीय नेपाळमध्ये राहतात. त्यांच्याशी त्याची पुनर्भेट घडवून आणण्यातही पंतप्रधानांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी येथे आल्यानंतर मोदींनी जितला त्याची आई खागीसारा, मोठा भाऊ दशरथ सारुमगर व लहान बहिणीच्या स्वाधीन केले. या भावुक पुनर्भेटीच्या वेळी दशरथची पत्नी आणि त्याची मुलेही उपस्थित होती. अनेक वर्षांनी तुम्हाला तुमचा मुलगा परत मिळाल्याने निश्चित तुम्ही आनंदी असाल, असे मोदी जितच्या आईला म्हणाले. आपल्या मुलाची काळजी घेतल्याबद्दल आईने मोदींचे आभार मानले. जितचे कुटुंबीय नेपाळच्या नवलपरासी जिल्ह्यातील झोपडपट्टीत राहतात. १६ वर्षांपूर्वी जित बहादूर हरवला होता. त्याचा भाऊ दशरथने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो जितचा ठावठिकाणा लावू शकला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी जित कायमचा हरवला, असे मानले होते. (वृत्तसंस्था)