शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

युद्धासाठी आमचे सैनिक तयार - पाक पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2017 15:53 IST

भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना सोमवारी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर पाक पंतप्रधान नवाज शरिफ यांनी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 11 - भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना सोमवारी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर पाक पंतप्रधान नवाज शरिफ यांनी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. नवाज शरिफ म्हणाले, आमचा देश शांतीपूर्ण आहे. शेजारील देशांशी आम्ही मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. जर आमच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट आल्यास आमचे सैनिक युद्धासाठी तयार आहेत. नवाज शरिफ पाकमधील नौदलाच्या कार्यक्रमात बोलत होते. पाक सैनिक सर्व प्रकारच्या आडचणीचा सामना करण्यासाठी तत्पर आहे. कोणतेही संकट आल्यास ते माघारी लावू शकतो. पाक नेहमी शेजारील देशाशी शांती आणि मैत्रीद्वारे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पुढे बोलताना शरिफ म्हणाले, शेजारील देशासोबत आम्ही सतत मैत्रीचा हात पुढे करत असतो. पण शांतीप्रमाणे आम्हाला आमच्या देशाच्या सुरक्षेचाही विचार करवा लागतोय. दहशतावादाविरोधातील सुरु असलेल्या लढाईवर बोलताना ते म्हणाले, दहशतवाद्यांच्या विरोधात कडक कारवाई सुरु आहे त्यामध्ये खुप सुधारणा झालेली आहे. पाकिस्तानमधील इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र असलेल्या द नेशननं पहिल्या पानावर "हेरगिरी करण्यासाठी मृत्यू" ही शिक्षा असल्याचं छापलं आहे. राजकीय आणि संरक्षण विश्लेषक डॉ. हसन अन्सारी यांच्यामते, या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील तणावामध्ये वाढ होणार असून, पाकिस्ताननं या गुन्ह्यासाठी गंभीर शिक्षा दिल्याचंही द नेशननं त्यामध्ये म्हटलं आहे."आउट ऑफ द वे" जाऊन कुलभूषण यांना वाचवू - स्वराजकुलभूषण जाधव भारताचा मुलगा आहे. त्यांनी हेरगिरी केल्याचा पाकिस्तानकडे कोणताही पुरावा नाही. काहीही करुण कुलभूषण यांना सरकार वाचवेल अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली. कुलभूषण सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा हा सुनियोजित कट आहे. पण आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही. काहीही करू, "आउट ऑफ द वे" जाऊन सरकार कुलभूषण यांना वाचवेल अशी भूमिका स्वराज यांनी मांडली.कुलभूषण जाधव यांना न्याय मिळावा यासाठी भारत सर्व प्रयत्न करणार आहे, त्यांच्याकडे भारताचा अधिकृत व्हिसा असताना त्यांच्यावर हेर असल्याचा शिक्का का? कुलभूषण यांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा असून त्यांना न्याय देण्यासाठी जे करावं लागेल ते सर्व केलं जाईल, असा शब्द केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिला.कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं गरजेचं- ओवैसीपाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं गरजेचं असल्याचं मत लोकसभेत एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मांडलं आहे. कुलभूषण यांच्या बचावासाठी मोदी सरकारनं स्वतःची सर्व शक्ती पणाला लावण्याची गरज आहे. कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणा, असंही ते म्हणाले आहेत.