उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन आणि अमेरिकेतील वैर सर्वश्रुत आहे. दरम्यान, या किंग जोंग उनचा खात्मा करण्यासाठी काही वर्षांपूर्वी अमेरिकेने जबरदस्त रणनीती आखली होती. २०११ साली अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या ओसामा बिन लादेन याला ठार मारणाऱ्या नेव्ही सिल्स कमांडोंना लादेनला ठार मारण्यासाठी तैनात करण्यात आले होते. तसेच ही योजना यशस्वी होण्यासाठी अमेरिकेने किम जोंगजवळ रेकॉर्डेड डिव्हाईस लावले होते. पण एका चुकीमुळे हा संपूर्ण प्लॅन चौपट झाला होता.
याबाबत न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेचा हा प्लॅन पूर्णपणे फसलला होता. किम जोंग उनला मारण्यासाठी पाठवण्यात आलेल्या कमांडोंकडून नागरिकांची हत्या करण्यात आल्यानंतर ही मोहीम आटोपती घेण्यात आली होती. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मोहिमेबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच या मोहिमेबाबत आपण काहीही ऐकले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या धोकादायक मोहिमेसाठी राष्ट्रपतींती परवानगी घेणं आवश्यक होते. मात्र असे करण्यात आले नव्हते. या मोहिमेसाठी अनेक महिने सराव करण्यात आला होता. मात्र तरीह अमेरिकेचा हा डाव फसला. मिळालेल्या माहितीनुसार ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कमांडोंच एक पथक पाणबुडीत बसून निघालं होतं. ही पाणबुडी उत्तर कोरियाच्या किनाऱ्याजवळ पोहोचली असताना त्यांना एक नाव दिसली. त्यामधून एका व्यक्तीने पाण्यात उडी मारली. ही व्यक्ती उत्तर कौरियाच्या नौदलाचा सैनिक असावा, असे अमेरिकन सैनिकांना वाटले. त्यामुळे त्यांनी त्याच्या दिशेने गोळीबार केला.
अमेरिकन सैनिकांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना काही मृतदेह पडलेले आढळले. मात्र त्यांच्याजवळ गणवेश किंवा कुठलंही हत्यार नव्हतं. त्यामुळे मारले गेलेले लोक हे उत्तर कोरियाचे नौसैनिक नव्हे तर सामान्य मच्छिमार होते, असे उघड झाले. त्यानंतर अमेरिकन सैन्याच्या पथकाने हे मृतदेह पाण्याच बुडावेत आणि कुणाला शंका येऊ नये म्हणून सदर रबरी बोट पंक्चर केली. दरम्यान, या घटनेची चौकशी करताना अमेरिकन सैन्याने या मृत्यूचं समर्थन केलं. तसेच अमेरिकेनेही आपल्यावर ओढवलेल्या या नामुष्कीजनक मोहिमेची माहिती गुपित ठेवली.