शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

काबूलमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट 80 ठार, 350 जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2017 14:44 IST

अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहर बुधवारी सकाळी बॉम्बस्फोटाने हादरले. परदेशी दूतावास असलेल्या वझीर अकबर खान भागात हा बॉम्बस्फोट झाला.

 ऑनलाइन लोकमत

काबूल, दि. 31 - अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहर बुधवारी सकाळी शक्तीशाली बॉम्बस्फोटाने हादरले. या बॉम्बस्फोटा आतापर्यंत 80 जण ठार झाले असून, 350 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे.  परदेशी दूतावास असलेल्या वझीर अकबर खान भागात हा बॉम्बस्फोट झाला. भारतीय दूतावासाच्या कार्यालयापासून 50 मीटर अंतरावर हा बॉम्बस्फोट झाला. भारतीय दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती भारतीय प्रतिनीधी मनप्रीत व्होरा यांनी दिली. 
 
बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणापासून काही मीटर अंतरावर असलेले घराचे दरवाजे आणि काचा फुटल्या. वझीर अकबर खान भागातून काळया धुराचे लोट उठताना दिसत आहेत.  स्फोटात अनेक गाडयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी गोंधळाची स्थिती असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. 
 
बॉम्बस्फोट झालेल्या परिसराला सुरक्षा दलांनी वेढा घातला आहे. जर्मन दूतावासाजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता अशी माहिती काबूल पोलिसांनी दिली. कोणाला टार्गेट करण्याच्या उद्देशाने हा बॉम्बस्फोट करण्यात आला ते स्पष्ट झालेले नाही. यापूर्वी सुद्धा काबूलमधील दूतावास असलेल्या भागात अशा प्रकारचे बॉम्बस्फोट झाले आहेत. 
 
अजून कुठल्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी घेतली नसली तरी, पण तालिबानवर संशय आहे. मागच्या महिन्यात तालिबानने अशा प्रकारचे हल्ले करण्याची धमकी दिली होती. परदेशी फौजा आणि नागरीक तालिबानचे मुख्य लक्ष्य आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेचे 8400 आणि नाटोचे 5 हजार सैनिक आहेत. 
 
तालिबानने अलीकडे मझार-ए-शरीफ भागातील अफगाण लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला केला होता. या हल्ल्यात 135 सैनिक ठार झाले होते. इसिसही अफगाणिस्तानात सक्रीय असून मागच्या महिन्यात अमेरिकेने अफगाणिस्तानच्या ननगरहार भागातील इसिसचे तळ उद्धवस्त करण्यासाठी जगातील सर्वात मोठा आणि सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्बहल्ला केला होता. इसिसचे दहशतवादी वापरत असलेले बंकर आणि बोगद्यांना लक्ष्य करण्याच्या इराद्याने 9800 किलो वजनाचा हा बॉम्ब टाकण्यात आला.