शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोर्तुगालमध्ये वणव्यामुळे लागलेल्या आगीत 57 जणांचा मृत्यू

By admin | Updated: June 18, 2017 16:54 IST

मध्य पोर्तुगालमधल्या पेड्रोगन ग्रँड परिसरात अचानक लागलेल्या वणव्यात 57 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली

ऑनलाइन लोकमतलिस्बन, दि. 18 - मध्य पोर्तुगालमधल्या पेड्रोगन ग्रँड परिसरात अचानक लागलेल्या वणव्यात 57 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.  तर या आगीत सुमारे डझनांहून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना आगीत होरपळून बहुतेकांचा मृत्यू झाला आहे. काल दुपारी लागलेल्या आगीवर अद्यापही अग्निशमन दलाच्या जवानांना नियंत्रण मिळवण्यात आलं नाही. अग्निशामक दलाचे जवळपास 500 कर्मचारी आणि 160 वाहने बचावकार्य राबवत असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आग लागलेल्या परिसरात कारमधील लोकांना बाहेर पडण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे अनेकांचा कारमध्येत जीव गेल्याची माहिती गृहमंत्री जॉर्ज गोम्‍स यांनी दिली आहे. आगीत अडकलेल्यांना मदतकार्य पोहोचविण्यासह आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात असून, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, असंही पोर्तुगाल सरकार सांगितलं आहे. राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो यांनी जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. शनिवारी या भागातील तापमान प्रचंड वाढल्यानं प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.