शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिश नागरिकाच्या विष्ठेतून पोलिओ विषाणूचा उत्सर्ग

By admin | Updated: August 30, 2015 22:24 IST

ब्रिटिश नागरिक गेल्या २८ वर्षांपासून त्याच्या विष्ठेतून पोलिओचा विषाणू बाहेर टाकत आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जर प्रतिकारशक्ती पुरेशी नसेल तर असे घडू शकते,

लंडन : ब्रिटिश नागरिक गेल्या २८ वर्षांपासून त्याच्या विष्ठेतून पोलिओचा विषाणू बाहेर टाकत आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जर प्रतिकारशक्ती पुरेशी नसेल तर असे घडू शकते, असे अटलांटा येथील सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे ओलेन किव यांनी म्हटले. या व्यक्तीला तोंडावाटे पोलिओचा डोस देण्यात आला होता. त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती पुरेशी नसल्यामुळे हे घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कमी प्रतिकार क्षमतेमुळे त्याच्या शरीरात पोलिओचा प्रतिविषाणू तयार झाला. अर्थात, असे घडणे ही काही दुर्मिळ बाब नाही; परंतु प्रदीर्घकाळ विषाणू तयार होण्याचे हे नोंद असलेले उदाहरण आहे, असे किव यांनी आपल्या संशोधन अहवालात म्हटले आहे. एखादी व्यक्ती जर पुरेशा प्रमाणात प्रतिजैविके तयार करू शकत नसेल, तर त्याच्या शरीरात किती काळ हा विषाणू फिरत राहावा याला काही मर्यादा नाही, असे विषाणू तज्ज्ञ किव म्हणाले. या व्यक्तीच्या नावावर या विषाणूचा विक्रम नोंदला गेलेला आहे व प्रत्येक जणाला ते मान्य आहे, असेही ते म्हणाले. हा विषाणू मूळ स्वरूपात जसा असतो तसाच तो शरीरात नसतो. त्याचे स्वरूप काहीसे बदलले जाते. कारण मानवाच्या शरीरातील प्रथिनांच्या हल्ल्यामुळे ते बदलते. सध्याची पोलिओची लस ही पोलिओच्या विषाणूचे स्वरूप कितीही बदलले तरी त्यापासून मानवाचे संरक्षण करण्यास सक्षम आहे. तरीही त्यांच्यातील बदलांकडे सतत लक्ष द्यावे लागते, असे या अहवालाचे सहलेखक व विषाणूतज्ज्ञ झेवियर मार्टिन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)