तैपेई : लहान मुलांमध्ये इंटरनेटवर व्हिडिओ गेम खेळण्याचे व्यसन दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुलांसोबतच आता मोठ्यांकडूनही याचा अतिरेक होत आहे. तैवानमध्ये काऊशिंग शहरात इंटरनेट कॅफेमध्ये सलग तीन दिवस व्हिडिओ गेम खेळल्यानंतर सीह (३२) नावाच्या व्यक्तीचा खुर्चीमध्येच मृत्यू झाला. यंदा अशाच पद्धतीने मृत्युमुखी पडल्याचे हे दुसरे प्रकरण आहे.काऊशिंग शहराच्या एका कॅफेत सीह नामक ही व्यक्ती आपल्या खुर्चीवर बेशुद्धावस्थेत आढळली.याबद्दल अधिक माहिती अशी की, एका दुसऱ्या व्यक्तीला सुरुवातीला तो झोपत असल्याचे वाटले; मात्र एका कर्मचाऱ्याला सीह श्वास घेत नसल्याचे लक्षात आल्यावर त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.द तैपेई टाइम्सनुसार, अनेक तास संगणकावर गेम खेळल्याने त्याची हृदयक्रिया बंद पडून त्याचा अचानक मृत्यू मृत्यूवेळी सीह कोणता गेम खेळत होता याबद्दल कळू शकले नाही. मात्र, ‘संगणकीय युद्ध’ खेळत असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. गेल्या १ जानेवारी रोजी न्यू तैपेई सिटीत व्हिडिओ गेम खेळणारा अन्य एका ३८ वर्षीय इसमा इंटरनेट कॅफेत मृत आढळला होता. या दोन्ही प्रकरणात पुरावे गोळा करण्यासाठी खुर्च्यांभोवती कडे केल्यानंतरही गेम खेळणारे मृत्यूबद्दल बेफिकीर होते आणि त्यांचा खेळ सुरुच होता, असे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)टेबलावरच डुलकी‘सीह इंटरनेट कॅफेचा नियमित ग्राहक होता. सलग अनेक दिवस तो व्हिडिओ गेम खेळत असत. थकल्यानंतर टेबलवरच डोके टाकून तो वामकुक्षी घेत वा खुर्चीवर डुलकी घेत होता. यामुळे आम्हाला सुरुवातीला त्याच्या प्रकृतीबाबत कळू शकले नव्हते,’ असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.
व्हिडिओ गेम खेळणे जिवावर बेतले
By admin | Updated: January 18, 2015 01:57 IST