शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सागरी पक्ष्यांच्या पोटातही प्लॅस्टिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 06:10 IST

प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाने आता महासागरांनाही व्यापले असून, मानवी वस्तीपासून शेकडो मैल दूर असलेल्या निर्जन बेटांवरील सागरी पक्ष्यांची पोटेही या प्लॅस्टिकने टम्म भरून त्यांचे जीव धोेक्यात आले आहेत.

लंडन : प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाने आता महासागरांनाही व्यापले असून, मानवी वस्तीपासून शेकडो मैल दूर असलेल्या निर्जन बेटांवरील सागरी पक्ष्यांची पोटेही या प्लॅस्टिकने टम्म भरून त्यांचे जीव धोेक्यात आले आहेत.प्लॅस्टिकमुळे पर्यावरणास असलेला धोका जगापुढे आणण्यासाठी ‘बीबीसी’ने अनेक डॉक्युमेंटरी तयार करण्याची योजना हाती घेतली आहे. याच मालिकेतील ‘ड्राउनिंग इन प्लॅस्टिक’ ही ताजी डॉक्युमेंटरी तयार करण्यासाठी सागरीजीव वैज्ञानिकांसह आॅस्ट्रेलियापासून ६०० किमी पूर्वेस असलेल्या लॉर्ड होव बेटावर गेलेल्या चमूला हे विदारक वास्तव दिसून आले.या बेटावर एका ठराविक प्रजातीच्या सागरी पक्ष्यांची मोठी वस्ती आहे. ‘बीबीसी’चा चमू तेथे पोहोेचला तेव्हा बेटाच्या खडकाळ किनाºयाच्या सांदेकपारींमध्ये या पक्ष्यांची लहान पिल्ले हजारोंच्या संख्येने होती. त्यांचे आई-वडील सागरात फेरफटका मारून खाद्य घेऊन येतात व पिल्लांच्या चोचीत भरवितात. पक्ष्यांची ही प्रजाती जे मिळेल ते खाणारी आहे. पिल्लांना काय भरविले जाते याची बाकराईने तापसणी केली असता त्यांची पोटे प्लॅस्टिकच्या कणांनीच टम्म भरली आहेत व त्यात सकस अन्न घालायला व पचवायला जागाच शिल्लक नाही, असे आढळून आले. वन्यजीव वैज्ञानिकांनी या पिल्लांना जीवदान देण्यासाठी त्यांची पोटे रिकामी करण्याचे काम हाती घेतले.चोचींतून नळी घालून पोटातील पदार्थ शोषून बाहेर काढले, तेव्हा अनेक पिल्लांच्या पोटांमध्ये प्लॅस्टिकचे शेकडो तुकडे भरलेले असल्याचे निष्पन्न झाले. लॉर्ड होव बेटावर पाहिली, तेवढी मन विषण्ण करणारी दुसरी कोणतीही गोष्ट मी पाहिली नव्हती.-लिझ बॉन्निन, डॉक्युमेंटरीची सादरकर्ती.