शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पाकमधील पेच चिघळला

By admin | Updated: August 23, 2014 00:22 IST

इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाच्या सर्व खासदारांनी सामूहिक राजीनामे देत शरीफ सरकारवर दबाव वाढविला आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानातील राजकीय पेच आज नाटय़मय वळण घेत आणखी गंभीर बनला असून विरोधी पक्षनेते इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाच्या सर्व खासदारांनी सामूहिक राजीनामे देत शरीफ सरकारवर दबाव वाढविला आहे.
पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसदेला घेराव आंदोलन चालूच ठेवीत इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते शाह महमूद कुरेशी आणि आरिफ अल्वी यांच्यासह पक्षाच्या सर्व 34 खासदारांनी आपले राजीनामे संसद (नॅशनल अॅसेम्ब्ली) अध्यक्षाच्या कार्यालयात सादर केले. यात इम्रान खान यांच्याही राजीनाम्याचा सामवेश आहे. दरम्यान, मतभेदामुळे सरकारविरोधी निदर्शने आज नवव्या दिवशीही चालूच आहेत.
इम्रान खान यांच्या पक्षाच्या खासदारांच्या सामूहिक राजीनाम्यांमुळे नवाज शरीफ सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. 342 सदस्यीय संसदेत पीएमएल-एनचे 19क् सदस्य आहे.‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’हा तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे. इम्रान खान आणि मौलाना ताहिर उल काद्री संसद भवनाबाहेर ठिय्या देऊन आहेत. बुधवारच्या चर्चेनंतर निदर्शने करणा:या संघटनांनी सरकारसोबतची चर्चा थांबविली आहे.
सामूहिक राजीनाम्यानंतर ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’च्या नेत्यांनी सरकारविरोधी निदर्शने आणि प्रांतीय विधानसभेतील या पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाने याच आठवडय़ात खैबर पख्तुनख्वा प्रांतीय विधानसभा वगळता इतर प्रांतिक विधानसभेचा राजीनामे देण्याचा निर्णय घेतला होता.  खैबर पख्तुनख्वामध्ये हा पक्ष सरकारसोबत चर्चा करीत आहे.
वाटाघाटीसाठी योग्य वातावरण निर्माण होऊ शकले नाही. जे मुद्दे तातडीने निकाली काढणो जरुरी आहे, त्यावर आधी भर द्यायला हवा, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांनी म्हटले आहे.  वाटाघाटीसंबंधी ताज्या स्थितीवर त्यांनी निराशा व्यक्त केली.
 दरम्यान, पंतपधान नवाज शरीफ यांनी संसद घेराव आंदोलनाप्रकरणी कोणाविरुद्धही कारवाई करण्याची शक्यता फेटाळतांना पदही सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, तर दुसरीकडे इम्रान खान आणि ताहिर ऊल-कादरी यांनी शरीफ हे राजीनामा देत नाहीत तोवर राजधानीत ठाण मांडण्याचा निर्धार केला आहे. मागच्या गुरुवारपासून लाहोरपासून सरकारविरोधी निदर्शने सुरू 
झाली. 
वाटाघाटीसाठी आणखी एक दरवाजा खुला झाला. तेव्हा सरकारने या संधीचा फायदा घ्यावा, अन्यथा कोंडी कायम राहण्याची शक्यता 
आहे, असे हक म्हणाले.  (वृत्तसंस्था)
 
4आम्ही आमचे राजीनामे संसदेच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केले आहेत, असे वृत्त डॉन न्यूजने  ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’चे नेते मुराद सईद यांच्या हवाल्याने दिले आहे. राजीनामे दिल्यानंतर शाह महमूद कुरेशी यांनी सांगितले की, 2क्13 ची सार्वत्रिक निवडणूक निष्पक्ष आणि स्वतंत्रपणो झाली नाही. तथापि, आमचा पक्ष राज्य घटनेचे पालन करणार असल्याची हमीही त्यांनी दिली आहे.  आता आम्ही इतर मोठय़ा शहरातही धरणो आंदोलन करणार आहोत.
 
4इम्रान खान पुन्हा वाटाघाटीला तयार झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्या खासदारांनी सामूहिक राजीनामे दिल्यानंतर पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ या पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. बैठकीनंतर शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितले की, आमचा पक्ष वाटाघाटींना तयार आहे.