शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

462 कोटी रुपयांत विकला गेला गुलाबी हिरा

By admin | Updated: April 5, 2017 15:24 IST

7.1 कोटी डॉलर म्हणजे सुमारे 462 कोटी रुपयांत दुर्मिळ प्रकारचा गुलाबी हिरा विकला गेला आहे. हाँगकाँगमधील सोदबी ऑक्शनमध्ये या हिऱ्याची विक्रमी किंमतीत विक्री झाली

ऑनलाइन लोकमतहाँगकाँग, दि. 5 - 7.1 कोटी डॉलर म्हणजे सुमारे 462 कोटी रुपयांत दुर्मिळ प्रकारचा गुलाबी हिरा विकला गेला आहे. हाँगकाँगमधील सोदबी ऑक्शनमध्ये या हिऱ्याची विक्रमी किंमतीत विक्री झाली. चॉव ताई फूक इन्टरप्रायझेसने या हिऱ्याला बोली लावून तो विकत घेतला आहे. लिलावासाठी उपलब्ध असलेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पॉलिश हिरा आहे. सर्वात मोठ्या लिलावाचा विक्रम ओपनहायमर ब्लू या हिऱ्याच्या नावे होता. मागील वर्षी मे महिन्यात 5 कोटी डॉलर म्हणजेच 235 कोटी रुपयांत या हिऱ्याचा लिलाव झाला होता.अंड्याच्या आकाराचा हा पिंक स्टार 59.6 कॅरेटचा हिरा आहे. लिलावाला सुरुवात होताच, अवघ्या पाच मिनिटातच याची विक्री झाली. दरम्यान, जिनिव्हामध्ये 2013 मध्ये झालेल्या लिलावात या हिऱ्याला 8.3 कोटी डॉलरची बोली लागली होती. पण नंतर खरेदीदाराला तेवढे पैसे देता आले नाही. हिऱ्यांची विक्री करणारे 77 डायमंड्सचे अलेक्झांडर ब्रेकनर यांनी सांगितलं की, इतिहासातील हा सर्वात मोठा गुलाबी हिरा आहे. रंगामुळे हिऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या हिऱ्याची किंमत जवळपास सहा कोटी डॉलर असेल असा अंदाज होता. डी बीयर्सने 1999 मध्ये आफ्रिकेच्या बोत्सवानामधील खाणीतून हा हिरा शोधला होता. यानंतर स्टेनमेत्ज डायमंड्सने दोन वर्षात त्याला पैलू पाडून चमकावलं. सुरुवातीला हा हिरा 132.5 कॅरेटचा होता. पण पैलू पाडून आणि पॉलिश करुन तो 59.60 कॅरेटचा झाला.