शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पेशावर दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार सैन्याच्या कारवाईत ठार

By admin | Updated: December 26, 2014 17:36 IST

पाकिस्तानमधील पेशावर येथील सैन्याच्या शाळेवर दहशतवादी हल्ला घडवणा-या तालिबानी कमांडरला पाकिस्तानी सैन्याने ठार मारले आहे.

ऑनलाइन लोकमत 

पेशावर, दि. २६ - पाकिस्तानमधील पेशावर येथील सैन्याच्या शाळेवर दहशतवादी हल्ला घडवणा-या तालिबानी कमांडरला पाकिस्तानी सैन्याने ठार मारले आहे. सद्दाम असे या तालिबानी कमांडरचे नाव असून तो 'तेहरिक ए तालिबान' या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता. 
काही दिवसांपासूर्वी पेशावरमधील लष्करी शाळेवर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये सुमारे १५० जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने या हल्ल्याविरोधात पाकमध्ये संताप व्यक्त होता. पाक सरकारनेही तालिबानी दहशतवाद्यांविरोधात कठोर पावले उचलण्याची घोषणा केली असून पाक सैन्याने तालिबानी दहशतवाद्यांनी आश्रय घेतलेल्या भागांमध्ये कारवाईला सुरुवात केली आहे. गुरुवारी रात्री खैबरमधील जमरुदपूर भागात पाक सैन्य आणि तालिबानी दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये तालिबानी कमांडर सद्दामला कंठस्नान घालण्यात यश आल्याची माहिती स्थानिक अधिका-यांनी दिली. या चकमकीमध्ये काही दहशतवादी गंभीर जखमी झाले असून त्यांना सैन्याने ताब्यात घेतले आहे. पेशावरमधील शाळेवरील दहशतवादी हल्ला आणि  पाकमधील सुरक्षा दलांवरील हल्ल्यामध्ये सद्यामचा सहभाग होता अशी माहिती पाकमधील सैन्याच्या अधिका-यांनी दिली.