शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पेशावर: विद्यार्थ्यांवर तालिबानी हल्ला

By admin | Updated: December 16, 2014 00:00 IST

पाकिस्तानमधील पेशावर येथील एका लष्करी शाळेवर ६ ते ७ दहशतवाद्यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात १६० निष्पाप विद्यार्थी ठार झाले आहेत. पाकिस्तानमध्ये तालिबान्यांनी केलेल्या या हल्याची जगभरातून निंदा करण्यात येत आहे.तालिबान्यांनी पेशावरमधील लष्करी शाळाला टार्गेट केल्याची माहिती मिळताच पाकिस्तानी सैनिकांनी विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. शाळेच्या ...

पाकिस्तानमधील पेशावर येथील एका लष्करी शाळेवर ६ ते ७ दहशतवाद्यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात १६० निष्पाप विद्यार्थी ठार झाले आहेत. पाकिस्तानमध्ये तालिबान्यांनी केलेल्या या हल्याची जगभरातून निंदा करण्यात येत आहे.

तालिबान्यांनी पेशावरमधील लष्करी शाळाला टार्गेट केल्याची माहिती मिळताच पाकिस्तानी सैनिकांनी विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. शाळेच्या परिसरात सैनिकांनी तालिबान्यांच्या दिशेने गोळीबार केला.

या हल्ल्याची जबाबदारी "तेहरीक - ए - तालिबान" या दहशतवादी संघटनेने स्वीकारली असून पाकिस्तानी लष्करांकडून होणा-या कारवाईचा बदला म्हणून आम्ही हा हल्ला केल्याचे म्हटले आहे.

दहशतवादी तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी विद्यार्थ्यांवर पेशावरमधील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

तालिबान्यांनी ओलिस ठेवलेल्या असंख्य विद्यार्थ्यांची पाकिस्तान सैनिकांनी सुखरुप सुटका केली. विद्यार्थ्यांची सुटका होताच त्यांनी आपल्या घराकडे धाव घेतली.

तालिबान्यांचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांच्या अतिरिक्त तुकड्या मागविण्यात आल्या. याच सैनिकांनी हल्ला केलेल्या ६-७ दहशतवादी तालिबान्यांचा खात्मा केला.

पेशावरमधील तालिबान्यांनी केलेला हा दहशतवादी हल्ला चिमुकल्या विद्यार्थ्यावर केलेला सर्वात मोठा हल्ला असून चिमुकल्यांचा जीव वाचविण्यासाठी पेशावरमध्ये असंख्य अ‍ॅम्यूलन्स रस्त्यावर धावाताना एकसारख्या दिसून आल्या.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात धिक्कार केला असून पाकिस्तानमध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

पाकिस्तानच्या पेशावरमध्ये तालिबान्यांनी केलेल्या हल्याचा तीव्र शब्दांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धिक्कार केला असून तालिबान्यांनी केलेला हा भ्याड हल्ला असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेले कैलास सत्यार्थी व मलाला युसूफझाई या दोघांनी या हल्ल्याचा निषेध केला. तालिबानी हल्ल्याची घटना ह्रदय पिळवटून टाकणारी संवेदनाहिन आणि क्रूर असल्याचे मलालाने म्हटले तर पेशावरमधील हल्ला हा मानवतेसाठी काळा दिवस असल्याचे कैलाश सत्यार्थी यांनी म्हटले आहे.

सकाळी साडे दहाच्या सुमारास तालिबानी दहशतवादी व पाकिस्तानी सैनिकांमध्ये सुरू झालेला रक्तपाताचा थरार तब्बल ७ तासानंतर संपला. शेकडो निष्पाप विद्यार्थ्यांचा जीव गेल्यानंतर हा थरार संपला.

शाळेतून परतणारा आपला चिमुकला आता कधीच परतणार नाही...ही वास्तवता स्वीकारण्यास आईची मानसिकताच राहिली नसून आपल्या लाडक्या मुलाच्या शवपेटीकडे पाहून शेकडो आईचा शोक अनावर झाला.