शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

लंडन-दुबईमध्ये घर, बँकांमध्ये कोट्यवधी रुपये; परवेझ मुशर्रफ यांची संपत्ती किती होती पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 14:32 IST

पाकिस्तानाचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांचं आज निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्यावर संयुक्त अरब अमिरातमधील (UAE) अमेरिकन रुग्णालयात उपचार सुरू होते. पाकिस्तानी मीडियाच्या माहितीनुसार ते अमाइलॉइडोसिस आजारानं ग्रस्त होते.

नवी दिल्ली-

पाकिस्तानाचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांचं आज निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्यावर संयुक्त अरब अमिरातमधील (UAE) अमेरिकन रुग्णालयात उपचार सुरू होते. पाकिस्तानी मीडियाच्या माहितीनुसार ते अमाइलॉइडोसिस आजारानं ग्रस्त होते. 

मुशर्रफ यांनी १९९९ ते २००८ पर्यंत पाकिस्तानमध्ये लष्करप्रमूखपद भूषवलं. ते २०१६ सालापासून दुबईत वास्तव्याला होते. त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आले. पाकिस्तानच्या नागरिकांचे पैसे हडपून मुशर्रफ यांनी परदेशात कोट्यवधींची संपत्ती जमा केल्याचा आरोप करण्यात आला. यातील काही संपत्ती त्यांच्या नावावर होती तर काही कुटुंबीयांच्या नावावर खरेदी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. 

कोर्टानं दिले होते संपत्तीच्या चौकशीचे आदेशएका प्रकरणाच्या सुनावणीवेळी पाकिस्तानच्या अँटी टेररिझम कोर्टानं फेडरल इनव्हेस्टिगेटीव्ह एजन्सीनं मुशर्रफ यांच्या संपत्तीची माहिती जमा करण्याचे आदेश दिले होते. एफएआयनं आपल्या रिपोर्टमध्ये मुशर्रफ यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा खुलासा केला होता. या अहवालानुसार पाकिस्तानात परवेझ मुशर्रफ यांच्या आठ संपत्ती आहेत.

पाकिस्तानात किती संपत्ती?कराचीमध्ये ५० लाखांचं घर, खायबान ए फैजल फेस-८ मध्ये १५ लाख रुपयांचा फ्लॅट, कराचीच्या डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटीमध्ये १५ लाख रुपये किमतीचा फ्लॅट, इस्लामाबादमध्ये ७.५ कोटी किमतीचा फ्लॅट, लाहोरमध्ये ६० लाख रुपये किमतीचा फ्लॅट आणि इस्लामाबादच्या शेहजादमध्ये ६० लाख रुपये किमतीचं फार्म हाऊस आहे. 

परदेशातही कोट्यवधींची संपत्तीपरवेझ मुशर्रफ यांनी लंडन आणि दुबईमध्ये कोट्यवधींची संपत्तीची खरेदी केली होती. मुशर्रफ यांनी लंडनच्या आलिशान हाइड पार्क परिसरात फ्लॅट खरेदी केला होता. ज्याची किंमत २० कोटी रुपये इतकी होती. याशिवाय त्यांनी दुबईतही २० कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला होता. एफएआयनं आपल्या रिपोर्टमध्ये मुशर्रफच्या जवळपास अर्धा डझनहून अधिक बँक खात्यांची माहिती सोपवली होती. ही बँक खाती पाकिस्तान आणि लंडनमधील आहेत. मुशर्रफ यांच्या परदेशी बँक खात्यांमध्ये जवळपास दोन कोटी डॉलर आणि पाकिस्तानातील बँकेत १२.५ लाख रुपये जमा आहेत. 

निवृत्तीनंतर मिळाले होते २ कोटी रुपयेपाकिस्तानातील एका पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार २०२० साली परवेझ मुशर्रफ यांच्याबाबत मोठा खुलासा केला होता. मुशर्रफ यांना निवृत्तीनंतर दोन कोटी रुपये मिळाल्याचा दावा केला गेला होता. २०१३ मध्ये पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार मुशर्रफ यांनी लष्करातून निवृत्त होत असताना मिळालेलं घर आणि संपत्तीची विक्री केली नव्हती.  

टॅग्स :Pervez Musharrafपरवेझ मुशर्रफ