शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

संगीत मैफलीत नरेंद्र मोदी यांचा शांतता संदेश

By admin | Updated: September 29, 2014 06:02 IST

येथील सेंट्रल पार्कमध्ये आयोजित ग्लोबल सिटीझन्स महोत्सवाच्या मैफलीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले

न्यूयॉर्क : येथील सेंट्रल पार्कमध्ये आयोजित ग्लोबल सिटीझन्स महोत्सवाच्या मैफलीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले व तेथील प्रमुख कलाकारांसोबत त्यांनी ६० हजारांच्या जमावाशी सहज संवाद साधला. युवकांच्या कॅन डू प्रवृत्तीचे त्यांनी खुल्या दिलाने कौतुक केले व युवकांत भारत बदलण्याची ताकद असल्याचे सांगितले. पांढराशुभ्र कुडता व निळे नेहरू जाकीट या पोशाखात सेंट्रल पार्कच्या सभेत आलेल्या मोदी यांनी सात मिनिटे इंग्रजीत भाषण केले. हाऊ आर यू डुइंग न्यूयॉर्क असा प्रश्न विचारून ते म्हणाले, युवकांना बंद सभागृहात न भेटता मोकळ्या उद्यानात भेटण्याची संधी मिळाल्यामुळे मी खुश आहे. जे झेड, बियॉन्स व इतर गायकांची गाणी चालली असताना नरेंद्र मोदी यांना कलाकार ह्यू जॅकमन याने व्यासपीठावर आणले. एकेकाळी चहाविक्रेता असणारे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनले आणि आता ते भारताचे पंतप्रधान आहेत अशी ओळख जॅकमन यांनी करून देताच यांनी बहुतांश अमेरिकन असणाऱ्या ६० हजार श्रोत्यांना नमस्ते म्हणून अभिवादन केले. सात मिनिटांच्या इंग्रजी भाषणातच त्यांनी संस्कृत भाषेतील शांततेचा श्लोक सादर केला. टाळ्यांच्या कडकडाटात या भाषणाचे स्वागत झाले , हा कार्यक्रम टीव्ही, लॅपटॉप, टॅब्लेट व संगणकावर पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही त्यांनी अभिवादन केले. अमेरिकेतील संगीत मैफलीत सामाजिक संदेश देणारे मोदी हे पहिले भारतीय नेते ठरले आहेत. तुम्ही भविष्य आहात, आज तुम्ही जे करता आहात त्यावर तुमचे भवितव्य ठरणार आहे. मला उद्यानात जमलेला हा युवकांचा जमाव पाहून आशा वाटू लागली आहे. तुमच्यात मला आश्वासक भविष्य दिसते आहे, तुम्हाला माझा सलाम. मला तुमचा, प्रत्येकाचा अभिमान वाटतो, तुमचे कुटुंबिय, मित्र, तुमचा देश यांनाही तुमचा अभिमान वाटत असेल, असे मोदी म्हणाले. गरिबीचे उच्चाटन, सर्वांना शिक्षण व स्वच्छता या मूल्यासाठी काम करणाऱ्या ग्लोबल सिटीझन मूव्हमेंटची मोदी यांनी प्रशंसा केली. काही जणांना वाटते की वृद्ध व्यक्तींच्या ज्ञानामुळे जग बदलते पण माझ्या मते तरुणांचा आदर्शवाद, संशोधकवृत्ती व काहीही करून दाखविण्याची कॅन डू ही प्रवृत्ती अधिक ताकदवान आहे, असे मोदी यांनी या भाषणात सांगितले. (वृत्तसंस्था)