शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

पॅरिस हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार

By admin | Updated: November 19, 2015 12:25 IST

पॅरिस हल्ल्याचा मास्टरमाइंड बेल्जिअमचा अब्देहमीद अब्बाउद मारला गेल्याचे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दोन अधिका-यांच्या हवाल्याने दिले आहे.

सेंट डेनिस : पॅरिस हल्ल्याचा मास्टरमाइंड बेल्जिअमचा अब्देहमीद अब्बाउद माराला गेल्याचे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दोन अधिका-यांच्या हवाल्याने दिले आहे. फ्रान्सच्या सेंट डेनिस उपनगरात एका अपार्टमेंटमध्ये बुधवारी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत दोन ठार झाले, तर सात जणांना अटक केली आहे. दरम्यान, स्फोटकांचे जॅकेट परिधान केलेल्या एका महिलेने स्वत:ला उडवून दिले. पॅरिस हल्ल्याचा सूत्रधार बेल्जिअमचा अब्देलहमीद अब्बाउद येथेच लपलेला होता व कारवाईदरम्यान तो ठार झाला, असे सांगण्यात येत आहे. पॅरिसच्या उपनगरात पोलिसांनी एका अपार्टमेंटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताच एका महिलेने स्वत:ला उडवून दिले. पोलिसांची ही कारवाई तब्बल सहा तास चालली. एका मोठ्या स्फोटानंतर ही कारवाई संपली. अर्थात या अपार्टमेंटमध्ये आणखी एक जण लपलेला असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस जेव्हा या अपार्टमेंटमध्ये घुसले तेव्हा त्यांना जोरदार हल्ल्याचा सामना करावा लागला. या कारवाईत चार पोलीस जखमी झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. याच अपार्टमेंटमधून तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांची ओळख अद्याप पटली नाही. अन्य एक पुरुष आणि एका महिलेला याच भागातून अटक करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी घेतली बैठकफ्रान्सचे राष्ट्रपती ओलांद यांनी छापेमारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनात वरिष्ठ मंत्र्यांची बैठक घेतली. दरम्यान, सेंट डेनिसच्या रहिवाशांनी सांगितले की, सकाळी साडेसातच्या सुमारास हा परिसर स्फोटांनी हादरून गेला. या भागातील पत्रकार बापतिस्ते मारी यांनी सांगितले की, दुसऱ्या स्फोटानंतर आणखी दोन स्फोट झाले.

फ्रान्स-रशिया यांचे हवाई हल्ले तीव्र 
पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्याच्या तसेच इजिप्तमध्ये रशियन विमान घातपातानेच पाडण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यावर फ्रान्स आणि रशिया यांनी गेल्या 72 तासांत उत्तर सिरियात ‘इसिस’च्या अड्डय़ांवर तीव्र हवाई हल्ले केले. त्यात किमान 33 जिहादी ठार झाले.
पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्सकडून कारवाई केली जाण्याची शक्यता ध्यानात घेऊन ‘इसिस’च्या दहशतवाद्यांनी खबरदारीची उपाययोजना केल्याने प्राणहानी मर्यादित राहिल्याचे मानवी गटातर्फे सांगण्यात आले.
फ्रान्सने हवाई कारवाईत किती विमानांचा वापर केला आणि किती वेळा हल्ले केले याचा तपशील मिळू शकला नाही; मात्र रशियाचे इजिप्तमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेले विमान घातपातानेच पाडण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रशियाने आपले हल्ले आणखी धारदार बनविले आहेत. 
मंगळवारी रशियाच्या 12 टीयू-22 एम-3 या लांब पल्ल्याच्या बॉम्बरनी राक्का येथे ‘इसिस’च्या अड्डय़ावर तीव्र बॉम्बफेक केली. याशिवाय 34 क्रूझ क्षेपणास्त्रेही डागण्यात आली. गेल्या 28 तासांत रशियन हवाई दलाने 2289 हवाई उड्डाणो करीत 111 हल्ले केले. त्यात 562 नियंत्रण केंद्रे, 64 प्रशिक्षण छावण्या आणि दारूगोळ्याची 54 ठिकाणो उद्ध्वस्त झाल्याचे रशियाच्या अधिका:याने सांगितले.
‘इसिस’च्या व अन्य पाश्चिमात्य समर्थक गटांनी हल्ले सुरू केल्यापासून सिरियाचे अध्यक्ष बशरद अल असद यांनी रशियाला लष्करी कारवाईची विनंती केली होती. त्यानुसार 3क् सप्टेंबरपासून रशियाने हवाई कारवाई सुरू केली आहे. त्यातच गेल्या 48 तासांत हवाई हल्ल्यात भाग घेणा:या विमानांची संख्या रशियाने दुप्पट केली आहे.