शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पॅरिस हल्ल्याचा मास्टरमाइंड अब्देलहमिदने केली आत्महत्या?

By admin | Updated: November 18, 2015 20:59 IST

संपूर्ण जगाला हादरवून टाकणा-या पॅरिस दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंट अब्देलहमीद अबौदने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. १८ - संपूर्ण जगाला हादरवून टाकणा-या पॅरिस दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंट अब्देलहमीद अबौद व त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याची शक्यता फ्रान्सच्या भारतातील राजदूतांनी वर्तवली आहे. फ्रेंच पोलिसांनी बुधवारी उत्तर पॅरिसमध्ये सुरू केलेल्या शोधमोहिमेदरम्यान एका अपार्टमेंटमध्ये लपलेल्या अब्देलहमीदने आत्महत्या केल्याची तर त्याच्या पत्नीने स्वत:ला बॉम्बने उडवल्याचे वृत्त समोर येत आहे.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी पॅरिसमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात १२९ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर फ्रान्समध्ये पोलिसांनी छापेमारी सुरु केली असून उत्तर पॅरिसमधील सेंड डेनिस येथे पोलिसांची शोधमोहीम सुरु होती. यादरम्यान एका इमारतीमध्ये लपलेल्या संशयित दहशतवादी व पोलिसांमध्ये चकमक झाली. त्या इमारतीतच पॅरिस हल्ल्याचा मास्टरमाइंड अब्देलहमीद लपला होता व त्याने आत्महत्या केली, अशी माहिती समोर येत आहे. या चकमकीदरम्यान एका महिलेने स्फोट घडवत स्वतःला संपवले , ती महिला अब्देलहमीदची पत्नी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
दरम्यान या कारवाईनंतर पोलिसांनी सात जणांना अटक केली असून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.