शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानींवरही बंदी?

By admin | Updated: January 31, 2017 00:43 IST

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत ज्या सात मुस्लीम बहुल देशांतील नागरिकांच्या अमेरिका प्रवेशावर घातलेल्या बंदीमध्ये पाकिस्तानचाही समावेश होऊ शकतो,

वॉशिंग्टन : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत ज्या सात मुस्लीम बहुल देशांतील नागरिकांच्या अमेरिका प्रवेशावर घातलेल्या बंदीमध्ये पाकिस्तानचाही समावेश होऊ शकतो, असे संकेत ट्रम्प प्रशासनाने प्रथमच दिले. काँग्रेस आणि ओबामा प्रशासनाने अतिशय धोकादायक दहशतवाद ज्या सात देशांत सक्रिय असल्याचे ओळखले होते ते कारण पाकिस्तानबाबतही असल्याचे व्हाईट हाऊसचे चीफ आॅफ स्टाफ रिन्स प्रिबस यांनी म्हटले. त्या आधारे हे संकेत देण्यात आले आहेत.आज फ्रान्स, बेल्जियम आणि जर्मनीमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती अमेरिकेत होऊ नये म्हणून ट्रम्प प्रशासनाने सात मुस्लीमबहुल देशांतील नागरिकांच्या अमेरिका प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे व यासाठी व्हाईट हाऊनने युरोपमध्ये वाढलेल्या दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख केला.इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, येमेन आणि सीरिया या देशांतील लोकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करणाऱ्या आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी स्वाक्षरी केली. या निर्णयावर जर्मनी, इंग्लड व फ्रान्सने जोरदार टीका केली आहे. ट्रम्प यांच्या आदेशामुळे या सात देशांतील कोणालाही ९० दिवस प्रवेश दिला जाणार नाही. (वृत्तसंस्था)बंदी हवीच : इम्रान खान- पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तहरिक ए इन्साफचे (पीटीआय) नेते इम्रान खान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लीमबहुल देशांवर घातलेली बंदी पाकिस्तानवरही असावी, अशीच इच्छा व्यक्त केली आहे. - पाकिस्तानातील खूप शिकलेले, हुशार, बुद्धिमान लोक चांगल्या नोकऱ्यांसाठी अमेरिकेत जात आहेत. ते या बंदीमुळे थांबतील व देशासाठी काम करू लागतील.- गुणवत्तेचे मोल समजणारी व्यवस्था पुन्हा आणली तर आमचे चांगले लोक परत येतील व देशासाठी काम करतील. गुणवत्तेचे मोल समजणारी व्यवस्था आम्ही पुन्हा आणली तर आमचे चांगले लोक परत येतील व देशासाठी काम करतील, असे खान यांनी म्हटले आहे.एमिरेट्स एअरलाइन्स अडचणीत- एमिरेट्सने अमेरिकेकडे जाणाऱ्या विमानांचे चालक आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्यावेळी कोणती कामे करावीत या क्रमातही बदल केले आहेत. ट्रम्प यांनी सात मुस्लीम देशांतील नागरिकांना अमेरिका प्रवेशावर घातलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर एमिरेट्सने हा निर्णय घेतला. - अमेरिकेच्या निर्णयामुळे विमानकंपन्यांना नव्या नियमांशी जुळवून घेण्यात अडचणी येत आहेत हेच सिद्ध केले. एमिरेट्सचे रोज अमेरिकेतील ११ शहरांत विमाने जातात.