शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी हॅकर्सकडून सायबर हल्ला, टाकली भारतविरोधी पोस्ट

By admin | Updated: May 10, 2017 12:36 IST

गेल्या महिन्यात देशातील आघाडीच्या 10 शिक्षणसंस्थांच्या संकेतस्थळांवर पाकिस्तानी हॅकर्सकडून सायबर हल्ला झाला होता

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 10 : गेल्या महिन्यात देशातील आघाडीच्या 10 शिक्षणसंस्थांच्या संकेतस्थळांवर पाकिस्तानी हॅकर्सकडून सायबर हल्ला झाला होता. आज पुन्हा पाकिस्तानी हॅकर्सनी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे संकेतस्थळ हॅक केले आहे. संकेतस्थळ हॅक करत त्यावर कुलभूषण जाधव आणि भारतविरोधी पोस्ट टाकण्यात आली आहे. काही वेळानंतर संकेतस्थळ पुन्हा सुरु झाले. पाक हॅकर्सने संकेतस्थळावर कुलभूषण जाधव यांचा फोटो आणि त्यासोबत फाशीचा फंदा टाकला आहे.  तुम्हाला कुलभूषण जाधव हवे आहेत का ? तुम्ही कुलभूषण जाधव यांच्या सुटकेची मागणी करत आहात का ? आम्ही तुम्हाला त्यांचा मृतदेह पाठवून देऊ, असा संदेश हॅकर्सनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे. तुम्हाला स्नॅपडिल आणि स्नॅपचॅटमधील फरक समजत नाही आणि तुम्ही कुलभूषण जाधव यांच्या सुटकेची मागणी करत आहात. असा मेसेज हॅकर्ससने संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.  

गेल्या महिन्यात दिल्ली विद्यापीठ, अलिगढ मुस्लीम विद्यापीठ, आयआयटी-दिल्ली , आयआयटी-बीएचयू , कोटा विद्यापीठ, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट अँड टेक्नॉलॉजी, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट आणि नॅशनल एरोस्पेस लॅब्रोटोरीज अँड बोर्ड ऑफ रिसर्च इन न्युक्लिअर सायन्सेस यांच्या वेबसाईट पाक हॅकर्सनी हॅक केल्या होत्या. या शैक्षणिक संस्थांच्या वेबसाइटस् हॅक करून त्यावर पाकिस्तान जिंदाबाद ही घोषणा टाकण्यात आली होती.

 

 

दरम्यान, हेरगिरी व विघातक कृत्ये केल्याचा आरोप ठेवून बलुचिस्तानमध्ये अटक केलेल्या आणि पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या कुलभूषण सुधीर जाधव यांच्या शिक्षेला नेदरलँडमधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (इंटरनॅशनल कोर्ट आॅफ जस्टीस) काल स्थगिती दिली आहे. भारताच्या मुसद्दीगिरीचा हा मोठा विजय असून आता कुलभूषण यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्याचे मानले जात आहे. ह्यइंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीसह्णने यासंदर्भात एक पत्र पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनाही पाठविले आहे. विशेष म्हणजे भारताने यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाचे दार ठोठावले होते.