शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

...म्हणून पाकिस्तानात महागाई कमी होत नाही, भारताप्रमाणे नोटाबंदी करा, अर्थतज्ज्ञाचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2023 09:59 IST

पाकिस्तानच्या एका अर्थतज्ज्ञाने देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याचा सल्ला दिला आहे.

पाकिस्तानमध्ये महागाई शिगेला पोहोचली आहे. देशात गरिबी एवढी आहे की, येथील लोकांवर अन्नासाठी भीक मागण्याची वेळ ओढावली आहे. गरीबीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान सरकारने अनेकवेळा आयएमएफकडे हात पुढे केला आहे. तरीही एक-दोनच देश मदतीसाठी पुढे आले आहेत, जे त्यासाठी पुरेसे नाही. 

दरम्यान, पाकिस्तानच्या एका अर्थतज्ज्ञाने देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी त्यांनी भारताकडून प्रेरणा घेऊन त्याच्या मार्गावर चालण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानी अर्थतज्ज्ञाने देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नोटाबंदीचा सल्ला दिला आहे. पण भारताचा मार्ग अवलंबून पाकिस्तान आपली गरिबी कमी करू शकेल का? जाणून घ्या...

बिझनेस टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे अर्थतज्ज्ञ अम्मार खान यांनी पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, देशात 5 हजार रुपयांच्या नोटेवर बंदी घातली पाहिजे. अलीकडेच अम्मार खान यांचा एक पॉडकास्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी 5 हजाराची नोट बंद करण्याचा सल्ला दिला आहे. 

अम्मार खान म्हणाले की, भारताने नोटाबंदीच्या फॉर्म्युलावर चांगले काम केले. त्यामुळे भारताच्या कर संकलनाचे आश्चर्यकारक परिणाम बघायला मिळाले. अशा परिस्थितीत पाकिस्तानने हा मार्ग अवलंबला तर कदाचित काही सुधारणा दिसून येईल. दरम्यान, 2016 मध्ये भारतात 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा रद्द करण्यात आल्या होत्या.

सर्कुलेशन आहेत 8 ट्रिलियन अम्मार खान पुढे सांगतात की, पाकिस्तानमध्ये सुमारे 8 ट्रिलियन रुपये तपासाशिवाय सर्कुलेशनमध्ये आहेत. अशा परिस्थितीत या 5 हजारांच्या नोटांवर बंदी घातली तर हे सर्व सर्कुलेशन येईल. पाकिस्तानमध्ये डिजिटल पेमेंट नाही, त्यामुळे येथे बहुतांश व्यवहार रोखीनेच केले जातात. तसेच, याठिकाणी आयात निर्यातीचे सर्व काम अमेरिकन डॉलरमध्ये केले जाते.

श्रीमंत लोकांकडे असते 'ही' नोटबहुतेक श्रीमंत लोकांकडे 5 हजाराची नोट आहे. अशा स्थितीत नोटाबंदीसारखा निर्णय येथे घेतल्यास सर्वसामान्यांना कोणतीही अडचण येणार नाही. त्यापेक्षा इथल्या बड्या लोकांना याचा त्रास होऊ शकतो आणि विरोधही होऊ शकतो. अम्मार खान म्हणाले की, नोटाबंदीमुळे जे 8 ट्रिलियन रुपये सर्कुलेशनमध्ये नाहीत, ते बँकांना मिळू शकले नाहीत, ते बँकांना परत मिळतील. त्यामुळे येथील परिस्थितीही काही प्रमाणात सुधारण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान