शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला नाही मिळणार कोहिनूर..

By admin | Updated: April 27, 2016 10:45 IST

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मुकुटातील 'कोहिनूर हिरा' पाकिस्तानत परत आणणे शक्य नसल्याचे पंजाब प्रांत सरकराने लाहोर उच्च न्यायालयात स्पष्ट केले

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २७ -  ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मुकुटातील 'कोहिनूर हिरा' पाकिस्तानात परत आणणे शक्य नसल्याचे पंजाब प्रांत सरकारने मंगळवारी लाहोर उच्च न्यायालयात स्पष्ट केले. १८४९ साली लाहोर कराराअंतर्गत कोहिनूर हिरा ब्रिटनला देण्यात आल्याने हा हिरा परत आणणे शक्य नसल्याचे सरकारने नमूद केले. याच कोहिनूर हिऱ्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून भारत सरकारकडूनदेखील प्रयत्न सुरू आहेत.
'कोहिनूर हिरा' पाकिस्तानत परत आणण्यासाठी सरकारला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका लाहोर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. बॅरिस्टर जावेद इक्बाल जाफरी यांनी याप्रकरणी याचिका दाखल करत दस्तुरखुद्द महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यासह पाकिस्तानमधील ब्रिटिश उच्चायुक्तालयाला प्रतिवादी केले होते. १०५ कॅरेट्सचा हा हिरा पाकिस्तानच्या निर्मितीपूर्वी अस्तित्वात असलेल्या प्रांताचा भाग होता, त्या न्यायाने त्याची मालकी आता पाकिस्तानकडेच असली पाहिजे, असा युक्तिवाद जाफरी यांनी केला होता. 
या मुद्यावर झालेल्या सुनावणीदरम्यान पंजाब प्रांत सरकारने न्यायालयात हा हिरा परत आणणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. ' १८४९ साली महाराजा रणजित सिंग यांनी ईस्ट इंडिा कंपनीसोबत केलेल्या कराराअंतर्गत हा हिरा ब्रिटीशांकडे सोपवण्यात आला होता. त्यामुळे आता पुन्हा या हि-याची मालकी मिळवण्यासाठी ब्रिटन सरकारकडे मागणी करता येणार नसल्याचे' सरकारने स्पष्ट केले