शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 11:14 IST

Pakistan Israel Conflict : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलला 'कॅन्सर' म्हटल्याने वाद निर्माण झाला होता. नेतन्याहू यांच्या इशाऱ्यानंतर आसिफ यांनी पोस्ट डिलीट केली.

इराणवरील हल्ले थांबले असले तरी इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील युद्धामुळे जागतिक राजकारण तापलेले असतानाच, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी इस्रायलवर केलेल्या एका जहरी टीकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलला 'मानवतेसाठी कलंक' आणि 'कॅन्सर' संबोधणारी एक सोशल मीडिया पोस्ट केली होती. मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आक्रमक पवित्रा घेत कडक शब्दांत फटकारल्यानंतर ख्वाजा आसिफ यांनी तातडीने ती पोस्ट डिलीट करत माघार घेतली आहे.

ख्वाजा आसिफ यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करताना इस्रायलवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी म्हटले होते की, "गाझा, इराण आणि आता लेबनॉनमध्ये इस्रायल निष्पाप लोकांची हत्या करत आहे. हा देश मानवतेसाठी शाप असून एक कॅन्सर आहे." इतकेच नव्हे तर, ज्यांनी पॅलेस्टाईनच्या भूमीवर हा देश वसवला ते नरकात जळतील, असे प्रक्षोभक विधानही त्यांनी केले होते.

नेतान्याहू यांचा पलटवारया पोस्टवर इस्रायलने तीव्र संताप व्यक्त केला. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने अधिकृत निवेदन जारी करत म्हटले की, "पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी इस्रायलला नष्ट करण्याचे केलेले आवाहन अत्यंत आक्षेपार्ह आहे. शांततेचा मध्यस्थ असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही सरकारकडून असे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही." इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी देखील याला 'ज्यू विरोधी' मानसिकता असल्याचे सांगत आसिफ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

पाकिस्तानचा यू-टर्नआंतरराष्ट्रीय दबाव आणि इस्रायलच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानच्या गोटात अस्वस्थता पसरली. अखेर कोणतीही अधिकृत माफी न मागता ख्वाजा आसिफ यांनी आपली वादग्रस्त पोस्ट 'X' वरून हटवून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या घटनेमुळे जागतिक स्तरावर पाकिस्तानच्या राजनैतिक भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Israel's warning silences Pakistan's minister; cancer post deleted.

Web Summary : Pakistani minister's anti-Israel post, calling it a 'cancer,' sparked outrage. After Israel's strong rebuke, the minister deleted the post amid international pressure, raising questions about Pakistan's diplomatic stance.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIsraelइस्रायलUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर