शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पाक म्हणजे दहशतवाद्यांना आश्रय देणारं नंदनवन- अमेरिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 23:55 IST

अमेरिकेनं पाकिस्तानला दहशतवाद्यांना सुरक्षा पुरवणा-या देशांच्या यादीमध्ये टाकलं आहे

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 19 - अमेरिकेनं पाकिस्तानला दहशतवाद्यांना सुरक्षा पुरवणा-या देशांच्या यादीमध्ये टाकलं आहे. अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार, लष्कर-ए-तोय्यबा, जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटना पाकिस्तानातून उपद्रव माजवतात. तसेच या संघटना दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन खुलेआम निधी जमवतात. पाकिस्तान सैन्य देशात दहशतवादी हल्ले करणा-या तहरिक-ए-तालिबान सारख्या दहशतवादी संघटनांवर कारवाई करते. मात्र अफगान तालिबान, हक्कानी नेटवर्कवर पुरेशी कारवाई करत नाही. अफगाणिस्तानात अमेरिकेचे हितसंबंध लक्षात घेता पाकिस्तानची क्षमता आधीच मर्यादित आहे. त्यामुळेच या दोन्ही दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून अफगाणिस्तानातील शांती प्रक्रिया खंडित करण्याचा पाकिस्तान प्रयत्न करत असते, असंही यंदाच्या अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या वार्षिक रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तसेच पाकिस्ताननं 2016पासून जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोय्यबा दहशतवादी संघटनांवर कोणतीही कारवाई केली नाही. या दहशतवादी संघटनांचा लक्ष्य एका ठिकाणी केंद्रित आहे. या संघटना पाकिस्तानातून स्वतःचा उपक्रम चालवत असतात. तसेच दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन निधीही गोळा करतात, असं म्हणत अमेरिकेनं पाकिस्तानला दहशतवाद्यांना आश्रय देणा-या देशांच्या यादीत टाकलं आहे. 

आणखी वाचा 

गेल्या काही दिवसांपूर्वी दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या नावाखाली पाकिस्तानला अमेरिकेकडून यापुढे कोणताही निधी मिळणार नाही. दरवर्षी अमेरिकेकडून पाकिस्तानला दहशतवादाविरुद्ध लढाईसाठी एक ठरावीक रक्कम दिली जाते. यापुढे हा पैसा कुठे खर्च केला, कसा खर्च केला याचा पाकिस्तानला हिशेब द्यावा लागेल, असंही अमेरिकेनं आधीच स्पष्ट केलं आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधीसभागृहात पाकिस्तानला दिल्या जाणा-या संरक्षण निधीसंदर्भातील अटी अधिक कठोर करण्यासाठी कायद्यामध्ये तीन दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या. 

 

651अब्ज डॉलरच्या एनडीए कायदा 2018मध्ये सुधारणा करण्यात आली. अमेरिकन काँग्रेसमध्ये 341 विरुद्ध 81 अशा आवाजी मतदानाने या तिन्ही  दुरुस्त्या मंजूर झाल्या. अमेरिकन प्रतिनिधी सभागृहाने केलेल्या या सुधारणानंतर यापुढे पाकिस्तानला दहशतवादाविरुद्ध लढाईत समाधानकारक प्रगती करुन दाखवावी लागेल. अमेरिकेकडून पाकिस्तानला जो निधी मिळतो तो निधी पाकिस्तान दहशतवाद संपवण्याऐवजी पोसण्यासाठी वापरतो असा आरोप अनेकदा झाला आहे.