शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

वाईट प्रतिमेसाठी स्वतः पाकिस्तानच जबाबदार - मलाला

By admin | Updated: April 15, 2017 17:15 IST

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने जागतिक पातळीवर पाकिस्तानची वाईट प्रतिमा होण्यासाठी तेथील स्थानिक नागरिकांनाच जबाबदार ठरवले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने जागतिक पातळीवर पाकिस्तानची वाईट प्रतिमा होण्यासाठी तेथील स्थानिक नागरिकांनाच जबाबदार ठरवले आहे. ईश्वरनिंदा केली म्हणून पाकिस्तानमध्ये एका विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करण्यात आली. इतकी बेदमी मारहाण केली यात त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.  या घटनेसंदर्भातच बोलताना मलालानं पाकिस्तानवर ही टीका केली आहे. जगभरात पाकिस्तानचे नाव खराब होण्याला दुसरे कोणी नाही तर स्वतः पाकिस्तानच जबाबदार आहे, असे वक्तव्य तिनं केले आहे.
 
एका व्हिडीओद्वारे मलालाने आपले म्हणणं लोकांपुढे मांडले आहे. "इस्लाम आणि पाकिस्तानला कशाप्रकारे बदनाम केले जात आहे, याची आपण चर्चा करतो. कुणीही आपल्या देशाला व धर्माला बदनाम करत नाही. पाकिस्तानची प्रतिमा खराब होण्यास पाकिस्तानातीलच लोकं जबाबदार आहेत. देशाचं नाव खराब करण्यासाठी आपण समर्थ आहोतच, अशी खोचक टीका मलालाने या व्हिडीओद्वारे केली आहे. 
 
गुरुवारी पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या 23 वर्षांच्या मशाल खान या विद्यार्थ्याला जमावाने मारहाण केली. त्याने ईश्वरनिंदा करणारी एक पोस्ट फेसबुकवर टाकली होती. बेदम मारहाण केल्यानंतर त्याला गोळी घालण्यात आली. हे कृत्य इथंवरच थांबलं नाही तर त्याच्या मृतदेहाचीही विटंबना करण्यात आली होती.
 
या घटनेसंदर्भातच मलालानं पाकिस्तानवर कठोर शब्दांत टीका केली आहे. मशालच्या वडिलांसोबत मलालानं संपर्क साधला. मुलाची हत्या झाल्यानंतरही त्याचे वडील देशात सहिष्णुता व शांतता निर्माण व्हावी,  अशी प्रार्थना करत असल्याचे मलालाने सांगितले. ही गोष्ट केवळ मशालच्या मृत्यूची नाही तर इस्लामच्या संदेशाचीदेखील ही हत्या आहे. आपण आपला धर्म, मूल्ये आणि चांगली वागणूक विसरलो आहोत, असंही मलालानं यावेळी म्हटले आहे.
 
मलाला पुढे असंही म्हणाली, "पाकिस्तानातील लोकांनी इस्लामचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.  कारण इस्लाम धर्म शांती आणि सहिष्णुतेचा संदेश देणार आहे.  प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाला सुरक्षित जगण्याचा अधिकार आहे. जर अशा प्रकारे लोकांची हत्या होऊ लागली  तर येथे कुणीच सुरक्षित राहणार नाही", अशी खंत मलालाने व्यक्त केली आहे.
 
पाकिस्तानातील धोरण निर्मात्यांना आणि राजकीय पक्षांनी अशा घटना पुन्हा होऊ न देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तेव्हाच मशालच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल, असे मतही मलालानं व्यक्त केले आहे.