शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय जिहादी शक्ती वाढण्यामागे पाकिस्तानच

By admin | Updated: February 8, 2016 03:20 IST

पाकिस्तानची शक्तिशाली गुप्तचर संस्था प्रदीर्घ काळापासून आंतरराष्ट्रीय जिहादी शक्तींना सहकार्य करीत होती आणि इसिसचा उदय होण्यामागे पाकिस्तानची ही संस्थाच असू शकते

न्यूयॉर्क : पाकिस्तानची शक्तिशाली गुप्तचर संस्था प्रदीर्घ काळापासून आंतरराष्ट्रीय जिहादी शक्तींना सहकार्य करीत होती आणि इसिसचा उदय होण्यामागे पाकिस्तानची ही संस्थाच असू शकते, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या प्रतिष्ठित अमेरिकी दैनिकाने म्हटले आहे.याबाबत न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या संपादकीय लेखात म्हटले आहे की, अनेक विदेशी संघर्षात पाकिस्तानचा हात आहे. तज्ज्ञांनी याबाबत अनेक पुरावे जमा केले आहेत. ते पाहता पाकिस्ताननेच तालिबानच्या अभियानात मदत केली. पाकिस्तानचा हा व्यवहार केवळ अफगाणिस्तानपुरताच मर्यादित नाही, तर अनेक विदेशी संघर्षातही पाकिस्तान हस्तक्षेप करीत आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने प्रदीर्घ काळापासून आंतरराष्ट्रीय मुजाहिद्दीन शक्तीचा प्रबंधक म्हणून काम केले आहे. त्यात बहुतेक सुन्नी कट्टरपंथी होते. इस्लामिक स्टेट किंवा ‘इसिस’चा उदय होण्यामागेही पाकिस्तानच असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तालिबान आणि अल काईदा यांना ‘आश्रय’ दिल्याचा पाकिस्तान भलेही इन्कार करीत असला तरीही आणि आपण स्वत:च दहशतवाद्यांचे शिकार बनलो आहोत, असा दावा करीत असला तरीही विश्लेषकांजवळ पाकिस्तानच्या भूमिकेचा सविस्तर अहवाल आहे. देशांतर्गत स्तरावर राष्ट्रीय आंदोलने चिरडण्यासाठी आणि त्यातही पश्तून समुदायाचे आंदोलन चिरडण्यासाठी इस्लामी दहशतवाद्यांचा शस्त्र म्हणून वापर करण्यासाठी त्यांचे पालणपोषण केले, हे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या उत्तर आफ्रिकेच्या प्रतिनिधी कार्लोट गाल यांनी लिहिलेल्या या लेखात म्हटले आहे की, अफगाणिस्तान हा आपलाच भूप्रदेश असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानात आपला प्रतिस्पर्धी भारताला आपले पाय रोवण्यापासून रोखण्यासाठी तेथील सुन्नी इस्लामी अतिरेकी कायम राहावेत यासाठी पाकिस्तान तालिबानचा वापर करीत आहे.तालिबानच्या अजेंड्याला चिथावणी देण्यासाठी त्यांना आश्रम देऊन त्यांना शक्य ती सर्व मदत केली आणि असे न करणाऱ्यांना नेस्तनाबूत केले. हीच बाब अल काईदा आणि अन्य विदेशी गनिमांना लागू होते.