शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरसाठी पाकिस्तानने दहशतवाद पोसला!

By admin | Updated: October 28, 2015 22:14 IST

काश्मिरमध्ये बंडखोरी करण्यासाठी १९९०च्या दशकात पाकिस्तानने लष्कर-ए-तैयबासारख्या संघटनांना पाठिंबा व प्रशिक्षण दिले, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनी दिली आहे

लाहोर : काश्मिरमध्ये बंडखोरी करण्यासाठी १९९०च्या दशकात पाकिस्तानने लष्कर-ए-तैयबासारख्या संघटनांना पाठिंबा व प्रशिक्षण दिले, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनी दिली आहे.‘दुनिया न्यूज’ या येथील वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ म्हणाले, ‘ १९९० च्या दशकात काश्मिरमध्ये स्वातंत्र्यलढ्यास सुरुवात झाली. त्यावेळी लष्कर-ए-तैयबा व ११ किंवा १२ अन्य संघटना स्थापन झाल्या. ते काश्मिरमध्ये जीवाची बाजी लावून लढत होते त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा व प्रशिक्षण दिले.’लष्करचे हाफिज सईद व झकीऊर रेहमान लख्वी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासंबंधीच्या प्रश्नावर मुशर्रफ उत्तर देत होते. मुशर्रफ म्हणाले, ‘सईद व लख्वी यांच्यासारखे काश्मिरी स्वातंत्र्यसेनानी त्यावेळी आमचे ‘हीरो’ होते. नंतर, धर्मावर आधारित बंडखोरीने दहशतवादाचे स्वरूप धारण केले. आता ते (पाकिस्तानातील बंडखोर) येथे स्वत:च्याच लोकांचे मुडदे पाडत आहेत. त्यांना आवर घालून थांबवायला हवे.’ मग सईद आणि लख्वी यांनाही असाच आवर घालायला हवा का, असा प्रश्न विचारला असता जनरल मुशर्रफ यांनी त्यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. (वृत्तसंस्था)१९७९मध्ये पाकिस्तान धार्मिक बंडखोरीच्या बाजूने होते. धार्मिक बंडखोरीची सुरुवातच पाकिस्तानने केली व त्यातूनच (अफगाणिस्तानात घुसलेल्या) सोविएत फौजांशी दोन हात करण्यासाठी जगभरातून बंडखोर सामिल झाले.जसे हीरो, तसेच लोक असतील : भारतनवी दिल्ली : पाक पुरस्कृत दहशतवादाचे समर्थन करणारे आणि हाफीज सईद, लखवी, ओसामा बिन लादेन यांना हिरो ठरविणारे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांना भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. जसे यांचे हिरो तसेच लोकही असतील, असा टोला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी लगावला आहे. भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या ५४ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना डोवल यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. नागेंद्र स्मृती व्याख्यानमालेत बोलतानाही त्यांनी मुशर्रफांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अतिरेकी कारवायांत अडकून राहू नका. वेळीच न सुधारल्यास अन्यथा पाक कधीही प्रगती करू शकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. दक्षिण आशियातील शांततेत भारताची भूमिका हा या व्याख्यानाचा विषय होता. दहशतवादासारखी कृत्ये करणे फायद्याचे असल्याचा पाकचा गैरसमज आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)