शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पाकमध्ये दर्गा व्यवस्थापकाने २0 जणांना केले ठार

By admin | Updated: April 3, 2017 04:50 IST

पाकिस्तानमधील सरगोधा शहरात शनिवारी रात्री एका दर्ग्याच्या व्यवस्थापकाने २0 जणांची चाकूने भोसकून हत्या केली.

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील सरगोधा शहरात शनिवारी रात्री एका दर्ग्याच्या व्यवस्थापकाने २0 जणांची चाकूने भोसकून हत्या केली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण असून, दोन महिला व ३ अन्य जण जखमी झाले आहेत.सरगोधाचे उपायुक्त लियाकत अली चट्टा यांनी सांगितले की, अहमद गुज्जर दर्ग्याचा व्यवस्थापक अब्दुल वाहीद याने दर्ग्यात आलेल्यांना चाकूने भोसकून आणि दांडुक्याने मारहाण करून ठार केले. मारण्यापूर्वी या अनुयायांना बेशुद्ध करण्यात आले होते. अब्दुल वाहिद हा विक्षिप्त असल्याचे सांगण्यात येते. जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार मृत्युमुखी पडलेले सर्व जण पंजाब प्रांताच्या विविध भागांत राहणारे आहेत. ही घटना घडल्यानंतर दर्ग्यातील एका महिलेने पळून जाऊ न इस्पितळ गाठले आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे हे हत्याकांड उघड झाले. पोलिसांनी वाहिद आणि त्याच्या पाच सहकाऱ्यांना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू़ आहे.तालिबानचा हल्ला ; आदिवासींची जोरदार निदर्शनेपेशावर : पाकिस्तानच्या पाराचिनार शहरात शोकसंतप्त आदिवासींनी तालिबानच्या हल्ल्यात ठार झालेल्या लोकांच्या मृतदेहांसह शनिवारी जोरदार निदर्शने केली. त्यांनी सुरक्षेतील ढिलाईवर टीका करताना हल्ल्याच्या सूत्रधारांवर कारवाईची मागणी केली. पाकिस्तान तालिबानने कुर्रम प्रांताच्या पाराचिनार शहरातील शिया इमामबाड्याला लक्ष्य करून शक्तिशाली कारबॉम्बस्फोट घडवून आणला. यात २४ लोक ठार तर इतर १०० जखमी झाले होते. पाराचिनार येथील लोकांनी हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांच्या मृतदेहांसह निदर्शने करून हल्ल्यात सहभागी लोकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. चर्चेनंतर निदर्शकांनी हल्ल्यात ठार झालेल्यांचे मृतदेह इमामबाड्यात नेले. तेथून ते दफनविधीसाठी त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येणार आहेत. स्थानिक आदिवासींनी तीन दिवसांचा दुखवटा घोषित केला आहे. रुग्णालयात १३५ जखमींना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ३७ जणांना हवाईमार्गे पेशावर हलविण्यात आले. ४० जणांवर उपचार सुरू आहेत. (वृत्तसंस्था)