शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात इसिसवर बंदी

By admin | Updated: August 30, 2015 00:54 IST

पाकिस्तानने इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेवर बंदी घातली आहे. तत्पूर्वी इराक व सिरियात थैमान घालणारी ही संघटना आपल्या भूभागामध्ये सक्रिय नसल्याचे पाकने

इस्लामाबाद : पाकिस्तानने इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेवर बंदी घातली आहे. तत्पूर्वी इराक व सिरियात थैमान घालणारी ही संघटना आपल्या भूभागामध्ये सक्रिय नसल्याचे पाकने वारंवार सांगितले होते, हे उल्लेखनीय. इस्लामिक स्टेट (इसिस) या संघटनेवर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे, असे गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाच्या शिफारशीवरून हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.संयुक्त राष्ट्राकडून बंदी घालण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तान सरकारला नियमितपणे माहिती दिली जाते. इस्लामिक स्टेटला पाठिंबा देणारी भित्तीपत्रके व बॅनर पाकमध्ये सातत्याने दिसून येतात; मात्र सरकारने इसिस पाकमध्ये सक्रिय असल्याचे आतापर्यंत नाकारले आहे. ही संघटना पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात हात-पाय पसरवत असल्याचे अलीकडचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. तालिबान नेता मुल्ला मोहंमद ओमरच्या मृत्यूनंतर इसिस संघटना अफगाणिस्तानात बळकट झाली आहे. पाकने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांच्या यादीत मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हफीज सईदची संघटना जमात उद दावा, अफगाणिस्तानातील कुख्यात हक्कानी नेटवर्क आणि इस्लामिक स्टेटचा समावेश नसल्याचे वृत्त आल्यानंतर पाकने इसिसचा या यादीत समावेश केला. पाकमध्ये वकिलाची हत्यापाकिस्तानात उच्च न्यायालयाच्या एका वकिलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सैयद अमीर हैदर शाह असे या वकिलाचे नाव आहे. सैयद अमीर कारने घरी परतत असताना तीन संशयितांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गुलशन-ए-इकबाल भागात हा हल्ला झाला. हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. गोळ्या लागल्यामुळे शाह गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे. तेथे तपासून त्यांना मृत घोषित करण्यात आले. (वृत्तसंस्था)