शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan SH 15 Howitzer: भारताची मिसाईल पडताच पाक बिथरला; अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या चिनी तोफा मागविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2022 15:42 IST

भारताच्या K-9 वज्र तोफेचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने चीनमध्ये तयार केलेल्या SH-15 तोफांचा आपल्या ताफ्यात समावेश केला आहे.

भारताच्या वज्र तोफेने बिथरलेल्या पाकिस्तानी लष्कराने चीनमध्ये तयार केलेल्या 155 मिमी SH-15 स्वयंचलित तोफेचा आपल्या ताफ्यात समावेश केला आहे. ही तोफ अधिक अंतरापर्यंत मारा करू शकते आणि यामुळे लष्कराला अधिक बळकटी मिळेल, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी दिली. पाकिस्तानने चीनला 52 तोफांची ऑर्डर दिल्याचं सांगण्यात येत आहे. चीनची ही अत्याधुनिक तोफ जवळपास 53 किमीपर्यंत मारा करू शकते. जर पाकिस्तान छोटा अणुबॉम्ब बनवण्यात यशस्वी झाला, तर या तोफेच्या मदतीने तो डागता येऊ शकेल असं मत संरक्षण क्षेत्रातील काही तज्ज्ञानी व्यक्त केलं.

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार S15 तोफ सहजपणे कुठेही नेली जाऊ शकते. 155 मिमी तोफ. ही तोफ घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या खिडक्या बुलेटप्रूफ आहेत. याची रेंज 53 किलोमीटर असल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते याची रेंज 72 किमी इतकी आहे. 5 जणांची टीम हे ऑपरेट करू शकते. तसंच याचं एकूण वजन 22 टन इतकं आहे. स्वसंरक्षणासाठी या तोफेवर मशीनगनही बसवता येते. ही तोफ कुठेही तैनात केली जाऊ शकते, असा दावाही पाकिस्ताननं केला आहे.चीनच्या सरकारी कंपनीनं केली तयारलहान अणुबॉम्ब सहजरित्या डागू शकत असल्यानं SH-15 ही स्वयंचलित तोफ भारतासाठी धोकादायक आहे. पाकिस्तान लहान अणुबॉम्ब बनवण्याचा अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. पाकिस्ताननं लहान अणुबॉम्ब तयार केल्याचा दावा पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनीही केला आहे. ही तोफ चीनच्या सरकारी कंपनी नोरिंकोने बनवली आहे. एका मिनिटांत सहा बॉम्ब डागण्याची याची क्षमता असल्याचं चीनचं म्हणणं आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत