शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाक तालिबानच्या प्रमुखाचा खात्मा?

By admin | Updated: March 24, 2015 02:17 IST

दहशतवादी संघटना तेहरिक-ए-तालिबानचा प्रमुख मुल्ला फजलुल्ला एका भीषण हवाई हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त आहे.

इस्लामाबाद : दहशतवादी संघटना तेहरिक-ए-तालिबानचा प्रमुख मुल्ला फजलुल्ला एका भीषण हवाई हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त आहे. गेल्या आठवड्यात खैबर पख्तुनख्वा प्रांतात पाकिस्तानने सुरू केलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेंतर्गत करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात तो ठार झाला.फजलुल्ला (४०) हा पेशावर येथील लष्करी शाळेवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे. २०१३ मध्ये हकिमुल्ला मेहसूद मारला गेल्यानंतर फजलुल्ला याच्याकडे पाक तालिबानची सूत्रे आली होती. हवाई हल्ल्यात तो गंभीररीत्या जखमी झाल्याचे सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले.सैन्य दलाने सांगितले की, कमीत कमी ८० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर १०० हून अधिक जखमी झाले. गेल्या आठवड्यात खैबर प्रांतात दहशतवादविरोधी मोहीम राबविण्यात आली. सैन्य दलाच्या कारवाईत फजलुल्ला दगावला गेल्याची शक्यता सैन्य दलाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सात सैनिक मृत्युमुखी पडले. खैबर पख्तुनख्वा प्रांताचे गव्हर्नर मेहताब खान अब्बासी यांनी सोमवारी सांगितले की, येत्या दिवसांत फजलुल्लाच्या मृत्यूस दुजोरा मिळेल. तथापि, तालिबानच्या प्रवक्त्याने आपला म्होरक्या मारला गेल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. निधनाचे वृत्त निराधार असल्याचे तालिबानचा प्रवक्ता मोहंमद खोरासानी म्हणाले. (वृत्तसंस्था)४फजलुल्ला हा ‘रेडिओ मुल्ला’ या टोपण नावाने ओळखला जातो. गेल्या १६ डिसेंबर रोजी पेशावर येथील लष्करी शाळेवरील हल्ल्याचा तो प्रमुख सूत्रधार आहे. या हल्ल्यात १५४ जण मृत्युमुखी पडले होते. ४पेशावर हल्ल्यानंतर पाक सैन्य दलाच्या प्रमुखांनी अफगाणिस्तानला भेट देऊन दहशतवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम उघडली होती. अफगाणिस्तान सरकार दीर्घकाळापासून तेहरीक-ए- तालिबानच्या कारवायांना लगाम घालण्याचे आवाहन पाकला करत होते.