शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पठाणकोटप्रकरणी पाकने कारवाई करावी

By admin | Updated: January 10, 2016 02:12 IST

दहशतवाद्यांचे जाळे समूळ नष्ट करताना कोणताही भेदभाव न करण्याचे पाकिस्तानने खाजगी आणि जाहीररीत्या दिलेले आश्वासन पाळावे आणि हवाईदलाच्या पठाणकोट येथील

वॉशिंग्टन : दहशतवाद्यांचे जाळे समूळ नष्ट करताना कोणताही भेदभाव न करण्याचे पाकिस्तानने खाजगी आणि जाहीररीत्या दिलेले आश्वासन पाळावे आणि हवाईदलाच्या पठाणकोट येथील तळावरील हल्लेखोरांवर कारवाई करावी, असे स्पष्ट मत अमेरिकेने व्यक्त केले आहे.पाकिस्तानातील गट आणि लोकांनी हवाईदलाच्या पठाणकोट तळावरील हल्ल्याचा कट रचून त्यानुसार कृती केली, असे भारतीय गुप्तचरांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने मुंबई हल्ल्याबाबत (२६/११) कट रचणाऱ्यांना जसे कोणत्या ना कोणत्या लगंड्या सबबी सांगून पाठीशी घातले तसे पठाणकोटबाबत होऊ नये, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने म्हटले. पठाणकोट हल्ल्याबाबत आम्ही चौकशी करणार असल्याचे पाकिस्तानने सांगितले असून, ती प्रक्रिया सुरू व्हावी; परंतु जे गुन्हेगार आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची इच्छा आहे, असेही या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. पठाणकोट हल्ल्यानंतरच्या काही दिवसांतच शरीफ सरकारने जी भूमिका घेतली त्याबद्दल या अधिकाऱ्याने समाधान व्यक्त केले. (वृत्तसंस्था)पाकिस्तानने पूर्वीप्रमाणे टाळाटाळ करू नयेपठाणकोट हल्ल्याबाबत आम्ही चौकशी करणार आहोत, असे पाकिस्तानने जाहीरपणे म्हटले आहे. दहशतवादी गटांबाबत आम्ही कोणताही भेदभाव करणार नाही, असेही पाकिस्तानने म्हटले आहे. आता आम्हाला पाकिस्तान बोलल्याप्रमाणे वागतो की नाही, हे बघायचे आहे, असे हा अधिकारी म्हणाला.पाकिस्तान सरकारने जे म्हटले आहे त्यानुसार त्याला कृती करण्यास वेळ दिला पाहिजे, असे अमेरिकेला वाटते आणि हे नाही तर ते कारण सांगून दहशतवादी गटांवर कारवाई करण्यास यापूर्वी पाकिस्तानने टाळाटाळ केली आहे, तसे यावेळी काही होणार नाही, अशी आम्हाला आशा असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.