शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पान ३- गोवा डेअरी ताब्यात घेऊ पर्रीकरांचा इशारा : दूध दरवाढ सरकारला अंधारात ठेवून

By admin | Updated: August 6, 2014 02:08 IST

पणजी : गोवा डेअरी सरकारला तब्यात घ्यावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिला. सरकारला अंधारात ठेवून दुधाचे दर वाढविण्यात आले असून एकूणच कारभाराची चौकशी करण्यात येईल, असे पर्रीकर यांनी सांगितले. तसेच दोन्ही जिल्‘ांत प्रत्येक एकेक डेअरी उभारण्याचा विचारही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पणजी : गोवा डेअरी सरकारला तब्यात घ्यावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिला. सरकारला अंधारात ठेवून दुधाचे दर वाढविण्यात आले असून एकूणच कारभाराची चौकशी करण्यात येईल, असे पर्रीकर यांनी सांगितले. तसेच दोन्ही जिल्‘ांत प्रत्येक एकेक डेअरी उभारण्याचा विचारही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार विष्णू वाघ यांनी आणलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना पर्रीकर विधानसभेत बोलत होते. दूध उत्पादन वाढविण्याचे सोडून डेअरी भलतेच उद्योग करीत आहे. सरकारने १८ कोटींचा पशुखाद्य प्रकल्प दिला तरी दूध उत्पादन वाढलेले नाही. लिटरमागे ९ रुपये ४० पैसे सरकार देते तरी काही फायदा नाही. डेअरी व्यवस्थापनाशी मागे चर्चा करून लिटरमागे २ रुपये दर कमी करण्याचे निर्देश दिले; परंतु नंतर व्यवस्थापनावरील पदाधिकार्‍यांनी तोंडच दाखवले नाही. आता दर वाढवले आहेत. त्याबाबतही सरकारला विश्वासात घेतलेले नाही, असा आरोप पर्रीकर यांनी केला. आमदार नरेश सावळ यांनी नवी दुग्ध उत्पादक सोसायटी आणण्यापेक्षा तीच डेअरी ताब्यात घ्या, ती जगवा अन्यथा सहकार क्षेत्रास कलंक लागेल, असे नमूद केले. राज्यात दुधाचा पुरवठा करण्यासाठी सहकारी तत्त्वावर चालणारी दूध उत्पादक सोसायटी आधीच अस्तित्वात असताना नव्या सोसायटीची गरज काय? असा सावल आमदार विष्णू वाघ यांनी केला. नवी दुग्ध सोसायटी स्थापन करण्यासाठी सरकारने केंद्राकडे परवानगी मागितल्याच्या वृत्ताने दूध उत्पादक व सोसायट्यांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे वाघ म्हणाले. सहकारमंत्री दीपक ढवळीकर यांनी अशी माहिती दिली की, गोव्याची दुधाची दिवशी गरज साडेतीन लाख लीटर आहे. पैकी ७८ हजार लिटर दुधाचेच उत्पादन होते. ५५ हजार लिटर दूध स्थानिक शेतकर्‍यांकडून मिळते. आमदार विष्णू वाघ यांनी सध्याच्या डेअरीचाच विस्तार करावा, अशी सूचना केली. (प्रतिनिधी)