शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हर केलं राव....4 चेंडूत दिल्या 92 धावा

By admin | Updated: April 12, 2017 12:12 IST

क्रिकेटच्या एवढ्या मोठ्या इतिहासात एखाद्या गोलंदाजाने एका ओव्हरमध्ये 92 धावा दिल्याचं तुम्ही कधी ऐकलं किंवा पाहिलं आहे का ?

ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. 12 - क्रिकेट म्हटलं की रोज नवनवीन रेकॉर्ड होत असतात, ते रोज तोडलेही जात असतात. क्रिकेटमध्ये रोज नवा रेकॉर्ड होताना आपण पाहिलं असेल. पण क्रिकेटच्या एवढ्या मोठ्या इतिहासात एखाद्या गोलंदाजाने एका ओव्हरमध्ये 92 धावा दिल्याचं तुम्ही कधी ऐकलं किंवा पाहिलं आहे का ? नक्कीच नसणार. पण बांगलादेशमधील क्लब क्रिकेट खेळणा-या एका गोलंदाजाने फक्त चार चेंडूंमध्येच एवढ्या धावा दिल्या आहेत. बसला ना आश्चर्याचा धक्का. एखादा गोलंदाज इतके वाईड बॉल टाकत असताना कर्णधाराने त्याची बॉलिंग काढून का घेतली नाही ? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील. पण मैदानावरील या इतिहासामागे एक कहाणी आहे.
 
ढाका सेकंड डिव्हिजन क्रिकेट लीगमध्ये मंगळवारी लालमटिया क्लब विरुद्ध एग्जोम क्रिकेटर्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. क्रिकेट कमिटी ऑफ ढाका मेट्रोपोलिस यांनी या लीगचं आयोजन केलं होतं. लालमटिया संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. 14 ओव्हर्समध्ये 88 धावा करत संपुर्ण संघ गारद झाला. यामध्ये एक रन आऊट, तीन विकेटकीपरकडे झेल, दोन पायचीत आणि एक स्टम्प आऊट झाला होता. 
 
यानंतर लालमाटिया संघ मैदानात उतरला असता गोलंदाज सुजोन महमूद याने पहिली ओव्हर टाकण्यासाठी चेंडू हातात घेतला आणि  फक्त चार चेंडूत 92 धावा देण्याचा पराक्रम केला. सुजोनने एकूण 65 वाईड आणि तीन नो बॉल टाकत विरोधी संघाला बॅटला चेंडू न लावण्याची संधी देत विजय मिळवून दिला. एग्जोम क्रिकेटर्स मैदानात उतरल्यानंतर सामोरी गेलेल्या पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी विजय मिळवला. अशाप्रकारे एकही चेंडू न खेळता आणि एकही विकेट न गमावता त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. 
 
गोलंदाजाची ही सुमार कामगिरी नसून त्याने जाणुनबुजून अशी गोलंदाजी केली. सुजोन महमूदने पंचांच्या वादग्रस्त निर्णयांना विरोध दर्शवण्यासाठी अशी गोलंदाजी केली. विशेष म्हणजे हा एकट्या सुजोन महमूदचा निर्णय नव्हता, तर संपुर्ण संघाने यासाठी त्याला पाठिंबा दिला होता. 
 
लालमटिया क्लबचे महासचिव अदनान रहमान यांनी सांगितलं की, "लालमटिया संघा पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे संतापला होता. त्यामुळेच त्यांनी हे कृत्य केलं". अदनान यांनी सांगितल्याप्रमाणे, "सामन्याच्या सुरुवातीपासूनच रडीचा डाव सुरु झाला होता. त्यांनी आमच्या कर्णधाराला टॉस पडल्यानंतर पहायलादेखील दिलं नाही. आमचे सर्व खेळाडू तरुण असून त्यांना हा रडीचा डाव पटला नाही. एकानंतर एक सर्व निर्णय आमच्याविरोधात होते. त्यामुळेच आम्ही त्यांना जिंकवून टाकलं".