शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा पाकमध्ये घुसून दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करू- अमेरिका

By admin | Updated: October 23, 2016 11:44 IST

दहशतवाद्यांना वारंवार अभय देण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेनं सडकून टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 23 - दहशतवाद्यांना वारंवार अभय देण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेनं सडकून टीका केली आहे. अमेरिकेनं पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयला दहशतवाद्यांना मदत करण्याचं बंद करा, अन्यथा पाकिस्तानात घुसून दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करू, असा इशारा दिला आहे. शनिवारी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे टेररिझम आणि फायनान्शियल इंटेलिजिएन्सचे अ‍ॅक्टिंग अंडर सेक्रेटरी अ‍ॅडम जुबिन पाकिस्तानला इशारा देत म्हणाले, पाकिस्तान सरकारची आयएसआय ही गुप्तचर यंत्रणा कोणत्याही प्रकारची कारवाई पाकमधील सक्रिय दहशतवादी संघटनांविरोधात करु इच्छित नाही. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानला नेहमीच पाठिंबा दिला आहे. मात्र पाकमधील आयएसआय ही संघटना दहशतवाद्यांवर कारवाई करत नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिका मागेपुढे पाहणार नाही. अ‍ॅडम जुबिन म्हणाले, पाकिस्तानमधील शाळा, बाजार आणि मशिदी या दहशतवाद्यांमुळे त्रस्त आहेत. दुर्दैवाने आजही तिथे हल्ले होतात. अशा हिंसक हल्ल्यांमुळेच पाकिस्तानला वारंवार मागे राहावं लागत आहे. दरम्यान, अमेरिकेनेही इशारा दिला असला, तरी आतापर्यंत पाकिस्तानने कधीच मान्य केलं नाही की, पाकमध्ये दहशतवादी संघटना सक्रीय आहेत. उलट आम्ही दहशतवादविरोधी लढाईमध्ये सहभागी आहोत, असेच कायम पाकिस्तान म्हणत आला आहे. मात्र, भारतीय सीमेवर किंवा भारतातील दहशतवादी हल्ले करणारे दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.