शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

..अन्यथा भारताविरोधात आम्ही सैन्याचा वापर करू- चीन

By admin | Updated: July 4, 2017 17:39 IST

सिक्कीममधल्या डोंगलांग भागातील सीमावादावरचं भारत आणि चीनमधलं वाकयुद्ध थांबण्याचं काही नाव घेत नाही

ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 4 - सिक्कीममधल्या डोंगलांग भागातील सीमावादावरचं भारत आणि चीनमधलं वाकयुद्ध थांबण्याचं काही नाव घेत नाही. भारतानं जर चीनचं ऐकलं नाही, तर चीन स्वतःच्या सैन्याच्या ताकदीचा वापर करेल, असं एका चिनी तज्ज्ञानं सांगितलं आहे. डोंगलांगमध्ये दोन्ही देशांमधील वादाचा हा तिसरा आठवडा आहे. दोन्ही देशांमधील हा वाद योग्यरीत्या हाताळला न गेल्यास युद्धाची परिस्थितीही निर्माण होऊ शकते, अशा इशारा चीनच्या थिंक टँकनं आधीच दिला आहे.भारताला समजावण्याचा चीन कसोशीनं प्रयत्न करत असून, सीमेवर शांती नांदावी यासाठी चीन कटिबद्ध आहे, असंही शांघाई अकॅडमी ऑफ सोशल सायन्सेजचे रिसर्चर फेलो हू झियोंग म्हणाले होते. मात्र तरीही भारतानं चीनचं न ऐकल्यास चीनकडे सैन्य शक्तीचा वापर करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नसेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीमुळेच भारत चीनला युद्धासाठी भडकावतो आहे. ट्रम्प यांच्या नजरेत भारत चीनशी मुकाबला करण्यासाठी कमकुवत आहे, असंही हू म्हणाले आहेत.(सिक्कीम सीमेवर भारतीय लष्करानं वाढवली कुमक)(सिक्कीमच्या नाथू ला येथून जाणारी कैलास मानसरोवर यात्रा रद्द)

सिक्कीम सीमेवर सध्या उद्भवलेला तणाव हा 1962च्या युद्धानंतर भारत आणि चीन यांच्या सैन्यामध्ये सर्वात दीर्घकाळ सुरू राहिलेला तिढा आहे. विशेष म्हणजे भारत आणि शेजारी भूतानने निषेध नोंदविल्यानंतर माघारी हटण्याऐवजी सीमेवरील चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने घेतलेला आक्रमक पवित्रा, भारताचे सीमेवरील दोन बंकर नष्ट केले जाणे आणि चीनच्या राजनैतिक प्रतिक्रियेला चढलेली अधिक तिखट धार पाहता भारताने सावधानता म्हणून ही तयारी केली आहे. खुद्द लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनीही प्रत्यक्ष जागेवर जाऊन काही दिवसांपूर्वी परिस्थितीचा आढावा घेतला होता. एवढेच नव्हे तर पाकिस्तान, चीन आणि देशांतर्गत अशांतता अशा अडीच आघाड्यांवर एकाच वेळी लढण्यास भारतीय लष्कर सज्ज आहे, अशी ग्वाहीही जनरल रावत यांनी दिली होती.डोका ला भागात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये शारीरिक रेटारेटी होऊन परिस्थिती गंभीर झाल्यानंतर भारतीय लष्कराने मेजर जनरल हुद्द्याच्या अधिकाऱ्याला तातडीने तेथे पाठवून चीनच्या समकक्ष लष्करी अधिकाऱ्याशी ध्वजबैठक घेण्याचा प्रस्ताव दिला. दोनदा नकार दिल्यानंतर तिसऱ्या वेळी चीन ध्वजबैठकीला आला पण डोका लाच्या लालटेन भागातून भारतानेच आपले सैन्य काढून घ्यावे, असा उरफाटा प्रस्ताव त्याने दिला. चीनने सिक्किम सीमेवरील या घटनाक्रमाचे निमित्त पुढे करून नथु ला खिंडीतून जाणारी कैलास-मानसरोवर यात्राही अडवून ठेवली.