शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागालॅंडमध्ये महिला आरक्षणाचा विरोध, सरकारी इमारतींची जाळपोळ

By admin | Updated: February 2, 2017 22:09 IST

सरकारी इमारतींची जाळपोळ,इंटरनेट सर्विस बंद, 1 फेब्रुवारीला होणा-या नगर परिषद निवडणुकाही रद्द

ऑनलाइन लोकमत
कोहिमा, दि. 2 - नागालॅंडची राजधानी कोहिमा येथे नगर परिषद निवडणुकांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे.  आंदोलनकर्त्यांनी अनेक सरकारी इमारतींची जाळपोळ केली आहे. 
 
आज या आंदोलनाने आणखी उग्र रूप धारण केलं असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निमलष्करी दलाला पाचारण करण्यात आलं आहे. तसंच राज्य सरकारने इंटरनेट सर्विस बंद केली असून 1 फेब्रुवारीला होणा-या नगर परिषद निवडणुका रद्द केल्या आहेत. हजारो लोकांच्या जमावाने सचिवालय, कोहिमा पालिका मुख्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत ही कार्यालये पेटवून दिली आहेत. 
 
येथील  जनजातीय संस्थेचा महिलांना आरक्षण देण्याचा विरोध आहे.   मंगळवारी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत दोन तरूणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. जोपर्यंत मुख्यमंत्री टी.आर. झेलिआंग आणि त्यांचे मंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत मृत तरूणांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाहीत अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.