शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग चौकशीची खुली सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 04:24 IST

अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पदावरून हटवावे की नाही, हे निश्चित करण्यासाठी त्यांच्याविरुद्धच्या महाभियोग चौकशीची खुली सुनावणी सुरू करण्यात आली

वॉशिंग्टन : अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पदावरून हटवावे की नाही, हे निश्चित करण्यासाठी त्यांच्याविरुद्धच्या महाभियोग चौकशीची खुली सुनावणी सुरू करण्यात आली असून, अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ही सुनावणी बुधवारी दूरचित्रवाणीवरून प्रसारित करण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे आपल्या तीन वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत सर्वात धोकादायक आव्हान उभे ठाकले आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी पदाचा गैरवापर केला का? असा प्रश्न हाऊस आॅफ इंटिलेजेन्स कमिटीच्या अध्यक्ष अ‍ॅडम शिफ यांनी महाभियोग चौकशीसाठी अधोरेखित केला आहे. प्रकरण आधी साधे आणि तेवढेच भयानक आहे. या प्रश्नांवरील उत्तराने अध्यक्षांच्या भवितव्यावरच नव्हे तर अध्यक्षपदाच्या भवितव्यावर परिणाम होणार आहे. अमेरिकी जनतेला आपल्या राष्ट्रप्रमुखांकडून कसे वर्तन अपेक्षित आहे, हे कळणार आहे. हा क्षण व्हॉईट हाऊसच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे.ट्रम्प यांनी युक्रेनच्या दुबळेपणा फायदा घेऊन अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ढवळाढवळ करण्याचे आमंत्रण दिले का? हे अमेरिकी जनता आणि जगाला या खुल्या सुनावणीतून ऐकण्याची पहिली संधी असेल. युक्रेनवर दबाव टाकून २०२० मध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटस्चे प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडेन आणि त्यांच्या पुत्राविरुद्ध भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी करण्याच्या मोबदल्यात ३९१ दशलक्ष डॉलरची लष्कर मदत देऊ केली, असा ट्रम्प यांच्यावर आरोप आहे. तथापि, ट्रम्प यांनी या आरोपाचा इन्कार करीत मी काहीही गैर केलेले नसल्याचे स्पष्ट केले.तीन साक्षीदार महत्त्वाचेमहाभियोग प्रक्रियेत होणा-या खुल्या सुनावणीत विल्यम टेलर (युक्रेनधमील अमेरिकी राजनैतिक अधिकारी), जॉर्ज केंट (युरोप, युरेशियन व्यवहार विभागाचे उपसहायक विदेशमंत्री), तसेच युक्रेनमधील अमेरिकेच्या माजी राजदूत मेरी योव्हानोविच या तीन मुख्य साक्षीदारांची साक्ष ट्रम्प यांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प