जायंट पांडाच्या अंगावरील कातडी ही विशेषत्वाने : काळी आणि पांढरीच का असते हे आम्ही शोधून काढले असल्याचा दावा डेव्हिस येथील युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्नियाच्या संशोधकांनी केला आहे. या आठवड्यात ‘बिहेव्हियरल इकॉलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात म्हटले आहे की पांडांच्या अंगावरील लव (फर) ही शत्रुला फसवण्यासाठी आणि संपर्कासाठी वापरली जाते. प्रो. टिम कॅरो हे या अभ्यासाचे प्रमुख आहेत. ते म्हणाले की पांडांच्या रंगाचा शोध घेणे हे यापूर्वी खूप अवघड होते, कारण तेव्हा तुलनेसाठी, असे जीवच नव्हते. जायंट पांडांचा रंग असा विलक्षण का हे समजून घेणे हे फार दिवसांपासून जीवशास्त्राला पडलेले कोडे होते कारण तुलनेसाठी अशा रंगाचा प्राणी उपलब्ध नव्हता. संशोधकांनी जायंट पांडाच्या शरीराच्या वेगवेगळ््या अवयवावरील फरची तुलना मांसभक्षी १९५ जाती आणि अस्वलाच्या वर्गातील ३९ जीवांच्या फरशी केली. त्यात पांडाचा पांढरा चेहरा, गळा, पोट आणि पार्श्वभागाचा उपयोग त्यांना बर्फाळ ठिकाणी लपण्यासाठी तर काळे हात व पाय सावलीत लपण्यासाठी मदत करतात, असे दिसले.
जायंट पांडाच्या काळ्या, पांढऱ्या रंगाचे रहस्य उघड
By admin | Updated: March 7, 2017 04:14 IST