शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

योग्यता सिद्ध केली तरच, अमेरिकेत मिळणार नोकरी

By admin | Updated: April 4, 2017 11:32 IST

अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसाला मंजुरी देण्यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी सुरु केली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

न्यूयॉर्क, दि. 4 - अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसाला मंजुरी देण्यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी सुरु केली आहे. याआधीच्या ओबामा प्रशासनाने H-1B व्हिसाला मंजुरी देताना ढिलेपणा दाखवल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे. ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात  अमेरिकेन नागरीकांचे रोजगार वाचवण्यासाठी H-1B व्हिसावर मर्यादा आणण्याचे आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी ट्रम्प प्रशासनाने सुरु केली आहे. 
 
अमेरिकन कंपन्यांच्या मालकांनी अमेरिकन कामगारांसोबत भेदभाव करण्यासाठी H-1B व्हिसा प्रक्रियेचा दुरुपयोग करु नये. अशी कुठलीही तक्रार आल्यास सखोल चौकशी करण्यास न्यायखाते कटिबद्ध आहे असा इशारा सहाय्यक अॅटॉर्नी जनरल टॉम व्हीलर यांनी दिला आहे. यूएससीआयएस ही अमेरिकन संस्था व्हीसा जारी करते. यापुढे H1B व्हीसा धारकांना कठोर निकषांमधून जावे लागेल असे यूएससीआयएसने आपल्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे. 
 
यापुढे फक्त पदवी दाखवून व्हिसा मंजूर होणार नाही तर, अर्जदाराला तो त्या नोकरीसाठी कसा पात्र आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करावे लागेल असे यूएससीआयएसने म्हटले आहे. H1B व्हीसासाठी आलेल्या अर्जाची छाननी करण्यासाठी नियम दोन दशकांपासून आहेत. पण कधी कठोरपण या नियमाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे नोकरीसाठी पात्र नसतानाही अनेकांनी नियमातील ढिलेपणाचा फायदा उचलून नोक-या मिळवल्या असे अमेरिकन न्याय खात्याने म्हटले आहे.  
 
यूएससीआयएसने कालपासूनच H1B व्हीसाचे अर्ज स्वीकारायला सुरुवात केली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाचा भारतीय आयटी तज्ञांना फटका बसू शकतो. भारतातून मोठया प्रमाणावर आयटी तज्ञ H1B व्हीसावर अमेरिकेत नोकरी करत आहेत. ट्रम्प यांच्या निर्णयावर अमेरिकेतील कंपन्यांमध्येच नाराजी आहे.