शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
3
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
4
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
5
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
6
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
7
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
8
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
9
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
10
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
11
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
12
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
13
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
14
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
15
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
16
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
17
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
18
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
19
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
20
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग

फिर एक बार कॅमेरुन सरकार; ब्रिटिश पंतप्रधानांची साद

By admin | Updated: May 7, 2015 05:46 IST

‘फिर एक बार कॅमेरुन सरकार’ ही पंतप्रधान कॅमेरुन यांची घोषणा. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न कॅमेरुन करीत आहेत.

आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान : भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांत चुरस; ६५० जागांसाठी मतदानलंडन : ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी मतदानाचा दिवस असून, मतदारांत सर्वात महत्त्वाचा गट असणाऱ्या भारतीयांना आकर्षित करण्याचे कोणतेही प्रयत्न राजकीय नेते सोडण्यास तयार नाहीत. ‘फिर एक बार कॅमेरुन सरकार’ ही पंतप्रधान कॅमेरुन यांची घोषणा अशापैकीच एक. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न कॅमेरुन करीत आहेत. ब्रिटनच्या या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल अगदीच अटीतटीचे लागण्याची शक्यता मतदानपूर्व चाचण्यांत व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधान कॅमेरुन यांच्या कॉन्झर्वेटिव पक्षाला अगदी कमी मताधिक्य मिळेल असे संकेत आहेत. लेबर पक्षाचे नेते एड मिलीबँड व लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे निक क्लेग मतदारांना जिंकण्याचा अखेरचा प्रयत्न करीत आहेत. मतदानपूर्व चाचण्या मतदानपूर्व चाचण्यांत तिन्ही पक्षांत अगदी आटोकाट स्पर्धा होईल असे चित्र आहे. यू गव्ह व सनच्या मतदानपूर्व चाचणीत सत्ताधारी कॉन्झर्वेटिव पक्षाला ३४ टक्के व एड मिलीबँड यांच्या लेबर पक्षाला ३३ टक्के मते मिळतील, तर स्थलांतरितांना विरोध करणाऱ्या यूकेआयपी पक्षाला १२ टक्के, तर लिबरल डेमोक्रॅट पक्षाला १० टक्के मते मिळतील असे म्हटले आहे.६५० जागांसाठी मतदानब्रिटिश संसदेत ६५० जागा असून, बहुमतासाठी ३२६ जागा मिळणे आवश्यक आहे. २०१० च्या निवडणुकीतही त्रिशंकू निकाल लागले होते. त्यावेळी कॉन्झर्वेटिव पक्षाला ३०७, तर लेबर पक्षाला २५८ जागा मिळाल्या होत्या. लिबरल डेमोक्रॅट पक्षाचा (५७ जागा) पाठिंबा घेऊन कॉन्झर्वेटिव (टोरी) पक्षाचे सरकार सत्तेवर आले. लिबरल डेमोक्रॅट पक्षाचे नेते निक क्लेग यांना या निवडणुकीत फारसे यश मिळणार नाही असे संकेत आहेत. त्यामुळे कोणतेही सरकार सत्तेवर येताना घोडेबाजार होणार असे स्पष्ट दिसत आहे. ब्रिटनच्या इतिहासात प्रथमच स्थलांतरितांची मते प्रभावी ठरतील असे दिसत आहे. (वृत्तसंस्था)ज्या ठिकाणी स्थलांतरित बहुसंख्येने आहेत, तिथे सध्याच्या खासदाराला जिंकणे अवघड झाले आहे. २०१५ च्या निवडणुकीत एकूण मते ४५ दशलक्ष असून त्यात भारतीय मतदारांची १५लाख मते निकालात मोठा बदल घडवून आणतील असे बोलले जात आहे. इंग्लंडच्या निवडणुकीत गोमंतकीय उमेदवार> पणजी : इंग्लंडमध्ये गुरुवारी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय वंशाचे उमेदवारही भवितव्य अजमावत असून त्यात गोव्याशी नाते सांगणारे पाच उमेदवार आहेत. तीन उमेदवारांचा विजय निश्चित समजला जात आहे. > ब्रिटिश संसदेत गेली अनेक वर्षे लेबर पार्टीचे प्रतिनिधित्व करणारे किथ व्हाज, त्यांच्या भागिनी व्हालेरी व्हाज तसेच कन्झरवेटिव्ह पार्टीतर्फे रिंगणात उतरलेल्या सुएला फर्नांडिस, लिबरल डेमोक्रॅट पार्टीचे रवी मार्टिन्स व अपक्ष उमेदवार विस्डम दा कॉश्ता यांचे मूळ गोमंतभूमीतील आहे. > किथ व व्हालेरी व्हाज यांचे गोवा व भारताशी अजूनही जिव्हाळ्याचे नाते आहे. किथ यांच्या प्रचारात अभिनेता अभिषेक बच्चनही सहभागी झाला होता. > व्हाज परिवार मूळचा उत्तर गोव्यातील कळंगुटचा. किथ हे लिसेस्टर (पूर्व) तर व्हालेरी या वालसाल (दक्षिण) मतदारसंघातून दुसऱ्यांदा संसदेत प्रतिनिधित्व करण्यास इच्छुक आहेत.> बारदेश तालुक्यातील उसकई गावाशी नाते असलेल्या व पेशाने वकील असलेल्या सुएला फर्नांडिस यांनी सहा वर्षांपूर्वी किथ व्हाज यांच्या विरोधात अयशस्वी लढत दिली होती. आता त्या फेअरहॅम या कन्झरवेटिव्ह पार्टीच्या बालेकिल्ल्यातून भवितव्य अजमावत आहेत.> हेमेल हॅम्पस्टीड मतदारसंघातील लिबरल डेमोक्रॅटचे उमेदवार रवी मार्टिन्स हे सासष्टी तालुक्यातील वार्का गावाचे आहेत. मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. विस्डम डिकॉश्ता हे देखील सासष्टी तालुक्यातील आहेत. कासावली हे त्यांचे मूळ गाव. ते विंडसर- मेडनहेडचे नगरपाल आहेत. (विशेष प्रतिनिधी)भारतीयांची संख्या लक्षणीय> सुमारे सात लाख भारतीय वंशाचे मतदार गुरुवारी मतदान करतील. ब्रिटनमध्ये सत्तेवर असलेल्या डेव्हिड कॅमेरून यांच्या कन्झर्वेटिव्ह पार्टीने तब्बल १९ भारतीय वंशांच्या उमेदवारांना मैदानात उतरवले आहे, तर लेबर पार्टीने भारतीय वंशाच्या १४ जणांना उमेदवारी दिली आहे.

मूर्तींचे जावई रिंगणात> इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक हे कन्झर्वेटिव्ह पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या रिचमंड (यॉर्कस्) मतदारसंघातून लढत आहेत. त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. इंग्लंडचे माजी परराष्ट्रमंत्री विलियम हेग यांच्या निवृत्तीनंतर सुनक यांना पक्षाने येथून उमेदवारी दिली आहे. मंत्रिपदाचे दावेदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.